तानबे शहराच्या धर्तीवर दोंडाईचाचा विकास!
By admin | Published: January 13, 2017 12:19 AM2017-01-13T00:19:52+5:302017-01-13T00:19:52+5:30
जयकुमार रावल : महापौर मॅनगोंची घेतली भेट
धुळे : जपान देशातील तानबे शहर पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय समृद्ध शहर असून या शहराच्या धर्तीवर जिल्ह्यातील दोंडाईचा शहराचा विकास व्हावा याकरिता राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी त्या शहराचे महापौर मित्सुतोषी मॅनगो यांची भेट घेतली. त्यावेळी मॅनगो यांनी या संदर्भात मदत करण्याचे आश्वासन मंत्री रावल यांना दिले.
पर्यटनमंत्री जयकुमार रावल सध्या जपान देशाच्या अभ्यास दौ:यावर आहेत. तेथे जपान शासनाच्या मदतीने महाराष्ट्र राज्याच्या विकासाकरिता विविध सामंजस्य करार केले आहेत. त्या अंतर्गत तानबे शहराचे महापौर मॅनगो यांच्याशी चर्चा केली. तेव्हा दोंडाईचा शहराच्या विकासासाठीदेखील मदत करण्याचे आश्वासन मॅनगो यांनी दिले.
विद्याथ्र्याशी साधला संवाद
पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी या दौ:यावेळी तानबे शहरामधील टोयो या शाळेला व कनिष्ठ महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील विद्याथ्र्याशी संवाद साधला. विद्याथ्र्यानी त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यांना रावल यांनी समर्पक उत्तरे दिली. विद्याथ्र्यानी त्यांच्यासमोर अनेक कलाप्रकारही सादर केले. तेथील प्राचार्य, शिक्षक यांनी रावल यांचे आभार व्यक्त केले.