दोंडाईचा हस्ती को.आॅप. बँकेचा पुणे सहकारी बँक असो.तर्फे सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 09:54 PM2019-01-01T21:54:05+5:302019-01-01T21:54:27+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : दोंडाईचा मुख्यालय व राज्यभर कार्यविस्तार असलेल्या दि हस्ती को-आॅप बँकेला, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकस् असोसिएशनतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले .
पुणे येथील बाल गंधर्व सभागृहात आयोजित कार्यक्रमात हस्ती बँकेचे जेष्ठ संचालक मदनलाल जैन ,पुणे शाखा व्यवस्थापक सुनिल अग्रवाल यांनी तो पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सुभाषराव देशमुख, प्रशासकीय मंडळ अध्यक्ष विद्याधर अनास्कर, असोसिएशनचे अध्यक्ष अँड.सुभाष मोहिते, जेष्ठ महिला संचालिका श्रीमती शिलाताई काळे उपस्थित होते.
दि हस्ती को आॅप.बँक लि. दोंडाईचा या बँकेने दि. ३१ मार्च २०१८ अखेर ढोबळ निष्क्रिय मालमत्तेचे प्रमाण ५टक्केपेक्षा कमी म्हणजे ३.१० टक्के इतके तसेच नेट एनपीए शुन्य टक्के राखण्यात यशस्वी झाल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला.
हस्ती बँकेचे मुख्य आधारस्तंभ स्व कांतीलाल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक प्रगती साधत असलेल्या हस्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष कैलास जैन, उपाध्यक्ष पहलाज माखीजा तसेच व्यवस्थापकीय संचालक प्रकाश कुचेरिया, सर व्यवस्थापक माधव बोधवाणी आणि अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या अथक प्रयत्नातून बँकेला राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.