हुंडय़ासाठी सासूलाही मारहाण
By admin | Published: April 15, 2017 12:20 AM2017-04-15T00:20:55+5:302017-04-15T00:20:55+5:30
विवाहितेचा सासरच्या लोकांनी छळ केला. तसेच माहेरी घेण्यासाठी आले असताना तिच्यासह तिच्या आईला जीवे ठार मारण्याचा प्रय} केल्याचा प्रकार घडला आह़े
धुळे : पतीला सोन्याची अंगठी व व्यवसायासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे, म्हणून विवाहितेचा सासरच्या लोकांनी छळ केला. तसेच माहेरी घेण्यासाठी आले असताना तिच्यासह तिच्या आईला जीवे ठार मारण्याचा प्रय} केल्याचा प्रकार घडला आह़े याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात तिच्या पतीसह सासरच्या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपाली संजय सोनकांबळे (रा.नटराज टॉकीजवळ, धुळे) या विवाहितेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, पतीसाठी कबुल केलेली अंगठी आणली नाही आणि पतीच्या व्यवसायासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे, यासाठी पतीसह दहा जणांनी शारीरिक व मानसिक छळ केला.
तसेच आपल्याला घेण्यासाठी आले असताना आपल्यासह आईला साडीने गळफास देऊन व पती संजयने तोंडावर तक्क्या ठेवून जीवे ठार मारण्याचा प्रय} केला.
तसेच संजय याने पहिली प}ी हयात असताना दुसरे लग्न केले. हा प्रकार 23 डिसेंबर 2012 नंतर वेळोवेळी सासरी व माहेरी घडला़ याप्रकरणी पती संजय अनिल सोनकांबळे, सासरे अनिल गोरख सोनकांबळे, सासू राधाबाई अनिल सोनकांबळे, दीर अरुण अनिल सोनकांबळे, व अन्य सहा नातेवाईक सर्व (रा.गजानननगर कोर्ट रोड, कोपरगाव जि.अहमदनगर) यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार आझादनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 307, 458(अ), 420, 406, 494, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नागलोत करीत आहेत़