धुळ्याच्या यात्रेत ड्रॅगन ट्रेन दगडावर उभी; भाविकांची सुरक्षा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 04:50 PM2018-04-01T16:50:09+5:302018-04-01T16:50:09+5:30

धोकादायक : पांझरा नदीपात्रात मुरूम व दगडाचा खच टाकून ठेवल्याने भाविकांना मार्गक्रमण करणे कठीण

The dragon train stands on a rock in Dhule; Security threat to devotees | धुळ्याच्या यात्रेत ड्रॅगन ट्रेन दगडावर उभी; भाविकांची सुरक्षा धोक्यात

धुळ्याच्या यात्रेत ड्रॅगन ट्रेन दगडावर उभी; भाविकांची सुरक्षा धोक्यात

Next
ठळक मुद्देयात्रेत दाखल झालेले पाळणे व इतर साहित्य रात्रीच्या वेळी खुलून दिसावे; याउद्देशाने अनेक व्यावसायिकांनी या साहित्यांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. हे साहित्य चालविण्यासाठी विजेची गरज असते. त्यामुळे व्यावसायिकांना जे वीज कनेक्शन देण्यात आले आहे. ते कनेयात्रा सुरू होण्यापूर्वी पांझरा नदी पात्रालगत प्रस्तावित रस्ते कामे सुरू होती. त्यात यात्रा असल्यामुळे येथे येणाºया व्यावसायिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात माती व दगडांचा खच टाकून कच्चा स्वरूपाचा रस्ता तयार करण्यात आला. परंतु, त्याही रस्त्याची पूर्णत: वाट लतसेच व्यावसायिकांना पाळणे, ट्रेन, ब्रेक डान्स व इतर साहित्य लावतानाही प्रचंड त्रास सहन करावा लागला. काही व्यावसायिकांना मिळालेली जागाही व्यवस्थित नसल्यामुळे अनेक व्यावसायिकांनी अद्याप साहित्यच लावले नसल्याचे चित्र येथे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे  :  खान्देश कुलस्वामिनी एकवीरादेवी यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. तरुणाई व लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी पांझरा नदीच्या पात्रात पाळणे,  ड्रॅगन ट्रेन व इतर मनोरंजनाचे साहित्य आले आहेत. परंतु, काही व्यावसायिकांनी ड्रॅगन ट्रेन बसविताना चक्क नदी पात्रात लाकडाच्या फळ्या तर काहींनी दगडावर ही ट्रेन उभी केली आहे. त्यामुळे भाविकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. दरम्यान, पांझरा नदीपात्राला लागून रस्ते विकासाची कामे सुरू असल्याने  येथील परिसरात यात्रोत्सवानिमित्ताने मुरूम व मातीचा खच टाकून कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. परिणामी, या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 
एकवीरा देवी यात्रोत्सवानिमित्त येथील परिसरात चैतन्यमय वातावरण आहे. भाविकांना आकर्षित करतील, अशा वस्तू विक्रीसाठी विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानावर ठेवल्या आहेत. खरेदी करणाºया भाविकांची संख्याही वाढत आहे. दुपारी कडाक्याचे ऊन असल्यामुळे यात्रेत दुपारी १२ ते ५ यावेळेत गर्दी कमी असली तरी सकाळी सहा ते बारा व सायंकाळी सहा वाजेनंतर यात्रेत गर्दी दिसून येत आहे. 
वाहनांना प्रवेशबंदी असतानाही घुसखोरी 
यात्रेत वाहनांना प्रवेश बंदी आहे. तरीही बाहेर गावाहून येणारे भाविक त्यांची वाहने थेट देवीच्या मंदिरापर्यंत आणत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 
सकाळच्यावेळी नेहरू चौक व पंचवटी परिसरात पोलीस राहत नसल्यामुळे त्याची संधी साधत अनेक भाविक त्यांची वाहने ही मंदिरापर्यंत घेऊन येतात. त्यानंतर ही वाहने बाहेर काढताना वाहनचालकांनाच मोठा त्रास होत आहे. 

मंदिर परिसरात नाराळाच्या किंमतीत वाढ
मंंदिर परिसरात यात्रोत्सवानिमित्त येणाºया भाविकांची संख्या वाढत आहे.  देवीला आलेले भाविक अहेर, ओटी व नारळ घेत असतात. भाविकांची गरज विचारात घेता, मंदिर परिसरातील विक्रेत्यांनी नाराळाच्या किंमतीत वाढ केली आहे. एक नारळ २५ ते ३० रुपये किंमतीने विक्रेते विक्री होत आहे. 
पूजेच्या साहित्यांमध्ये अहेराची साडी २०० ते २५० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. गेल्यावर्षाच्या तुलनेत भाविकांचा पाहिजे; त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती येथील विक्रेत्यांनी  दिली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात व्यवसाय वाढेल, अशी अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली. 

Web Title: The dragon train stands on a rock in Dhule; Security threat to devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे