शिंदखेडा येथे नाट्यछटा अविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 10:14 PM2019-01-08T22:14:45+5:302019-01-08T22:15:13+5:30
प्रविण माळींचा एकपात्री प्रयोग : अहिराणी बोली भाषेचा आदर करा; क्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त येथील माळी वाड्याच्या जयंती उत्सव समितीतर्फे शिरपूरच्या प्रविण माळी यांच्या एकपात्री मनोरंजनातून समाजप्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सुदाम महाजन होते.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेषातील मृण्मयी संजयकुमार महाजन आणि रंजना ज्ञानेश्वर गवळे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी प्रविण माळी यांनी ‘आयतं पोयतं सख्यानं’ हा एकपात्रा नाट्याविष्कार सादर केला. कार्यक्रमास महिलावर्गासह तीन हजार नागरिक उपस्थित होते.
लग्नसमारंभा दरम्यान मुलगी बघायला जाण्यापासून मुलीच्या विदाई कार्यक्रमापर्यंत घडणाऱ्या विविध प्रसंग, घटना अहिराणी भाषेत खुमासदार शैलीत प्रविण माळी यांनी सादर केले. या बाबी सादर करताना त्यांनी तरुणांचे बेजबाबदार वर्तन, व्यसनाधिनता, मोबाईचा अतिरेकी वापर यावर परखडपणे विनोदी शैलीत भाष्य केले. फुले दाम्पत्याच्या कार्याचा परिचय करुन दिला. विनोदी शैलीतील हा कार्यक्रम अडीच तासापर्यंत रंगला. तहसीलदार महाजन यांनी अहिराणी बोली भाषेला आदर करण्याचे आवाहन केले. विविध सण समारंभातील अहिराणी गितांचा संग्रह पुढील पिढीने जनत करावा, असे आवाहन केले. यावेळी गावातील विविध शाळांमधून सावित्रीबाई फुले यांच्या विषयी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद जाधव, मुन्ना माळी, संदीप माळी, केशव माळी, सतिष माळी, विनोद माळी, भूषण माळी, सुखदेव माळी, हर्षल माळी, निलेश माळी, कल्पेश माळी, विजय माळी, चेतन माळी, जयेश माळी, कुणाल सोनवणे, अविनाश माळी, प्रविण माळी, ईश्वर माळी यांनी परिश्रम घेतले.
त्यांना विजय जाधव, संजय महाजन, प्रा.दीपक माळी यांनी मार्गदर्शन केले.