विनाकारण फिरणाऱ्यांवर आता ‘ड्रोन’ची नजर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 09:37 PM2020-04-27T21:37:54+5:302020-04-27T21:38:17+5:30
टवाळखोरांवरही बसणार चाप : जिल्हा प्रशासनासह पोलीस झाले अलर्ट
धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जनजागृती होत असताना वारंवार सांगूनही घराबाहेर विनाकारण फिरणाºया टवाळखोरांवर आता ‘ड्रोन’ ची नजर आहे. यासाठी पोलीस ठाण्यात स्वतंत्र्य नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे़ ड्रोनने टिपलेल्या परिसरातील गर्दी हटविण्यासाठी पोलिसांचे पथकही तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
कोरोना विषाणू संदर्भात धुळे जिल्हा पोलीस विभागातील जिल्हास्तरीय कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे़ कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन करण्यात आलेला असून संचारबंदी लावण्यात आलेली आहे़ या संचारबंदीचे उल्लंघन करत विनाकारण फिरणारे गर्दी करुन थांबणाºया टवाळखोरांची संख्या वाढत असल्याने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी आता ड्रोन कॅमेराचा उपयोग करण्यास सुरुवात केलेली आहे़
तीन ड्रोन घिरटया घालताय् - आता दिवसभर पोलिसांचे तीन ड्रोन कॅमेरे सतत शहरातील विविध परिसरात घिरटया घालत राहणार आहे. या ड्रोनचे नियंत्रण शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे़ कुठे गर्दी दिसली की ती हटविण्यासाठी या कॅमेराची मदत मिळत आहे़ आता सुरुवातीला हा प्रयोग प्रायोगिक तत्वावर आहे़ गर्दी दिसते त्याठिकाणी जाऊन पोलीस लोकांना हटवित आहे. परंतू पुढे मात्र यासंदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई ही करण्यात येईल.
जिल्ह्यात आंतरजिल्हा तपासणी १९ ठिकाणी केली जात आहे़ संचारबंदीचे उल्लंघन संदर्भात ३५३ गुन्हे दाखल आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरीकांनी घरातच थांबावे़ विनाकारण फिरु नये़ अन्यथा, कारवाई करणे भाग पडेल़ - चिन्मय पंडीत, पोलीस अधीक्षक