दोंदवाड येथील खुनाची दोन दिवसात उकल, एकाला अटक
By admin | Published: April 20, 2017 12:43 AM2017-04-20T00:43:52+5:302017-04-20T00:43:52+5:30
धुळे : शिरपूर तालुक्यातील दोंदवाड येथील अनिल पावरा खून प्रकरणाचा तालुका पोलिसांनी दोन दिवसात उलगडा केला आहे.
धुळे : शिरपूर तालुक्यातील दोंदवाड येथील अनिल पावरा खून प्रकरणाचा तालुका पोलिसांनी दोन दिवसात उलगडा केला आहे. एकाला अटक केली असून त्याने अनिल पावरा याचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे़ नथ्थू उर्फ नाना बुधा पावरा (वय २५, रा़ महादेव दोंदवाडा) असे संशयित आरोपीचे नाव आहे़ मयत अनिल छगन पावरा (वय ३१ रा़ महादेव दोंदवाडा) हा १४ रोजी रात्री गावात रोडाली बघण्यासाठी आला होता़ लघुशंकेला जातो, असे पत्नीला सांगून तो निघून गेला होता़ १५ रोजी रात्री १२़३० ते सकाळी ६़३० वाजेदरम्यान महादेव दोंदवाडा ते बभळाज रोडवर धवईकुंड नाल्याशेजारी त्याचा कोणीतरी दगडाने ठेचून खून केला़ याप्रकरणी त्याचे वडील छगन पावरा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता़
गुन्ह्यात नाना पावरा याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला मंगळवारी अटक करण्यात आली़ त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली आहे़ गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी केला.
दुसºयाशी लग्न केल्याने खून
नाना पावरा याला मयताच्या पत्नीशी लग्न करायचे होते़ मात्र अनिल पावरा याने तिच्याशी लग्न केले़ त्याचा राग धरून अनिल हा रात्री एकटा जात असताना त्याचा पाठलाग करून नाल्याजवळ त्याला गाठले़ त्याच्याशी वाद घालत दगडाने ठेचून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले. अशी माहिती स.पो.नि देशमुख यांनी दिली.