आठवडे बाजारावर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:32 AM2019-04-19T11:32:58+5:302019-04-19T11:33:21+5:30

वरुळ : पालेभाज्यांची आवक घटली; भाव वधारल्याने ग्राहकांची संख्या रोडावली

Due to the drought on the market for weeks | आठवडे बाजारावर दुष्काळाचे सावट

dhule

Next

तहाडी : शिरपूर तालुक्यातील वरुळ, भटाणे, जवखेडा, तºहाड, तºहाडीसह परिसरात मागीलवर्षी पावसाने पाठ फिरवल्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये परिसरातील विहिरी, साठवण तलाव, कूपनलिका आटल्या आहेत़ त्यामुळे शेतकºयांनी नव्याने पालेभाज्यांची लागवड केली नाही़  येथील मगंळवारच्या आठवडे बाजारात पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे़ त्याच बरोबर या पालेभाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत़  त्याची छाया वरूळ येथील मंगळवारी आठवडे बाजारावर पडली असल्याचे पहावयास मिळाले़ 
एरवी बाजारपेठेत ग्रामीण भागातील बाजार करणाºयांची अधिक गर्दी असते़ परंतु मंगळवारी बाजार करणाºयांची संख्या रोडावली असल्याचे दिसून आले़  
तसेच उलाढालही कमी झाल्याचे व्यापारी, शेतकºयांनी सांगितले़  शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने शेतकरी व शेतमजूर आर्थिक चणचणीत असल्याने याचा परिणाम आता बाजारपेठेवरही होऊ लागला आहे़ 
वरूळचा मंगळवारचा आठवडे बाजार म्हटले की, खेड्यापाड्यातील नागरिकांची भाजीपाला खरेदीसाठी गर्दी असते़  ही गर्दी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत कायम असते़  मात्र, मंगळवारी दुपारच्या वेळी आठवडे बाजारात फेरफटका मारला असता ग्राहकांची तुरळक गर्दी दिसून आली़. एकूण ग्राहकांचा विचार केला असता भाजीपाला व कापड दुकानांची संख्याच जास्त दिसून आली. 
आठवडे बाजाराचा मुख्य घटक म्हणून पालेभाज्या विक्रेत्यांकडे पाहिले जाते़   तुरळक गर्दीचा सर्वाधिक फटका या विक्रेत्यांना बसला़. बाजारच्या अनुषंगाने अनेक विक्रेते ठोक स्वरुपात पालेभाज्या खरेदी करतात़ दिवसभर हा माल विक्री केल्यानंतर हातात अल्प रक्कम राहत आहे़  
दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने खेडेगावातून येणाºया ग्राहकांची संख्या रोडावली आहे़. परिणामी विक्रेत्यांना माल विक्रीसाठी काही वेळेस दरही काही प्रमाणात कमी आकारावा लागत आहे़  तसेच बाजार परिसरातील हॉटेल्समध्ये एरवी होणारी ग्राहकांची गर्दीही कमी झाली असल्याचे दिसून आले़  दुष्काळी परिस्थितीची छाया संपूर्ण आठवडे बाजारावर पडली असल्याने काही व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचे पहावयास मिळाले़. त्यात भाज्यांचे भावही वाढल्याने बाजारावर परिणाम दिसूत येत आहे.

Web Title: Due to the drought on the market for weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे