दुष्काळामुळे सेंद्रीय खताचे भाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 04:20 PM2019-04-08T16:20:59+5:302019-04-08T16:21:38+5:30
पशुपालकांमध्ये चिंता : कवडीमोल दर मिळत असल्यामुळे स्वत:च्याच शेतात खताचा भराव
कापडणे : परिसरातील पशुपालकांच्या गायी, म्हशी, बैल यांच्या सेंद्रीय खताची दुष्काळामुळे विक्री होत नसल्याने पशुपालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यामुळे पशुपालक शेतकरी नाईलाजास्तव स्वत:च्याच शेतात सेंद्रीय खत टाकत आहेत.
दोन वर्षापूर्वी एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीभर सेंद्रीय खताला तब्बल पाच हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत होते. गेल्यावर्षी तो दर चार हजार रुपये झाला. तर यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे तीन हजार रुपये ट्रॉलीप्रमाणे सेंद्रीय खताला भाव मिळत आहे.
दरवर्षी उन्हाळी हंगामात शेतीची कामे उरकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होते. त्याचप्रमाणे यंदाही या हंगामात कुजलेले कोरडे सेंद्रीयखत शेतात टाकण्याची कामे सध्या सुरू आहे. मात्र, खूपच कमी प्रमाणात शेतकरी आपल्या शेतात सेंद्रीयखत टाकताना दिसून येत आहेत