Video : पूराच्या पाण्यामुळे फोफादे गावचा संपर्क तुटला, तिन्ही बाजूचे रस्ते बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 02:19 PM2019-08-09T14:19:22+5:302019-08-09T14:22:02+5:30
पावसामुळे दोन्ही नद्यांच्या पुराचे पाणी बुराई नदीतुन धरणात जाते.
हर्षद गांधी
निजामपूर - साक्री तालुक्यात फोफादे गाव बुराई धरणाच्या सांडव्याच्या पुरामुळे तिन्ही बाजूने अलग थलग पडले आहे. सांडव्यावर मोठा पुल बांधला जावा अशी मागणी अद्याप दुर्लक्षित आहे. बुराई नदीच्या उगम क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे बुराईस मोठा पूर आला आहे व त्यातच रोहिणी नदीच्या उगम क्षेत्रात खुडाणे, डोमकानी परिसरात दोन दिवसांपासूनच्या पावसामुळे रोहिणी नदीसही मोठा पूर आला आहे.
पावसामुळे दोन्ही नद्यांच्या पुराचे पाणी बुराई नदीतुन धरणात जाते. धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने त्या पुराचे पाणी सांडव्यातून व त्यावरील छोट्या फरशीवरून वाहते आहे. पाण्यास जोरदार ताण आहे. आखाडे, निजामपूर,जैताणे गावा कडन फोफादे गावास जोडणाऱ्या रस्त्यात हा सांडवा व फारशीअसल्याने ट्राफिक पार होऊ शकत नाही. तसेच पुढे हा सांडवाफोफादे उभरांढी आणि दुसाणे मार्गात अशीच अडसर ठरतो. त्यामुळे फोफादे गाव दोन्ही तिन्ही बाजूने अलग पडले आहे सांडव्याचे पाणी कमी होईल तेंव्हाच फोफादेच्या लोकांना गावाबाहेर जाता येईल. सांडव्यावर उंच पूल उभारला जावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून होते आहे.
बुराई नदीला पूर, गावांचा संपर्क तुटला pic.twitter.com/pJswARGqe3
— Lokmat (@MiLOKMAT) August 9, 2019