थकबाकीमुळे धुळे जिल्ह्यात प्रादेशिक पाणी योजना डबघाईस
By admin | Published: May 6, 2017 05:21 PM2017-05-06T17:21:28+5:302017-05-06T17:21:28+5:30
3 कोटी 42 लाख 20 हजार 628 रुपयांचे वीज बिल थकल्यामुळे त्या बंद पडल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली़
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 6 - धुळे जिल्ह्यात असलेल्या 9 प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांकडे 3 कोटी 42 लाख 20 हजार 628 रुपयांचे वीज बिल थकल्यामुळे त्या बंद पडल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली़ ग्रामस्थांनी नियमित बिल भरल्यास त्या पुन्हा जोमाने सुरू होतील, असे जि.प.चे म्हणणे आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय स्थिती पाहता ब:याच ठिकाणी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत़ त्यातील काही बंद असल्या तरी ज्या सुरू आहेत त्यांच्याकडेसुद्धा वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचा सूर आह़े
जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात नळपाणीपुरवठा योजनांसह प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत़ धुळे तालुक्यात 141 ग्रामपंचायती असून त्यात 168 गावे आणि 202 वाडय़ा आहेत़ साधारणपणे 4 लाख 55 हजार 966 इतकी लोकसंख्या आह़े साक्री तालुक्यात 168 ग्रामपंचायती असून त्यात 229 गावे आणि 517 वाडय़ा आहेत़ साधारणपणे 4 लाख 58 हजार 816 इतकी लोकसंख्या आह़े
शिरपूर तालुक्यात 118 ग्रामपंचायती असून त्यात 147 गावे आणि 304 वाडय़ा आहेत़ साधारणपणे 3 लाख 53 हजार 952 इतकी लोकसंख्या आह़े शिंदखेडा तालुक्यात 123 ग्रामपंचायती असून त्यात 141 गावे आणि 143 वाडय़ा आहेत़ साधारणपणे 2 लाख 53 हजार 757 इतकी लोकसंख्या आह़े अशा एकूण जिल्ह्यात 550 ग्रामपंचायती असून त्यात 685 गावे आणि 1 हजार 116 वाडय़ा आहेत़ साधारणपणे 15 लाख 22 हजार 491 इतकी लोकसंख्या आह़े
जिल्ह्यात 2 हजार 189 हातपंप आहेत़ त्यापैकी 1 हजार 694 हातपंप बारमाही सुरू आहेत़ असे असले, तरी 495 हातपंप हे कायमस्वरूपी बंद आहेत़ धुळे तालुक्यातही एकही हातपंप हा कायमस्वरूपी बंद नाही़ साक्री तालुक्यात 229, शिरपूर तालुक्यात 168 आणि शिंदखेडा तालुक्यात 98 असे एकूण 495 हातपंप कायमस्वरूपी बंद आहेत़
विशेष म्हणजे योजना आल्या, की त्यांच्याकडील वीज वितरण कंपनीचे बिल हे आलेच़ त्यामुळे त्या-त्या ग्रामपंचायतीने आपल्याकडील वीज बिल वेळेवर भरणे आवश्यक आह़े त्यासाठी ग्रामस्थांनीसुद्धा वेळेवर सहकार्य केल्यास कोणत्याही प्रकारची थकबाकी होणार नाही़ योजना या पूर्ण क्षमतेने सुरू राहतील, हे स्पष्ट आह़े पण केवळ ग्रामस्थांची उदासीनता असल्याने ही वस्तुस्थिती प्रकर्षाने जाणवत असल्याचे समोर येत आह़े