धुळे येथे ईपीएस पेन्शनर्सचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 10:57 AM2019-01-04T10:57:04+5:302019-01-04T10:58:23+5:30
आजी-माजी आमदारांनी दिली आंदोलनस्थळी भेट
आनलाइन लोकमत
धुळे : आपल्या विविध मागण्यांसाठी ईपीएस-९५ पेन्शनर्सनी गुरूवारी क्युमाईन क्लबसमोर धरणे आंदोलन केले. मागण्यांसाठी जिल्हाधिकाºयांमार्फत राष्टÑपतींना साकडे घातले.
निवेदनात म्हटले आहे की, राष्टÑीय संघर्ष समितीचे राष्टÑीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारे आंदोलने करून पेन्शनर्सना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ४ ते ७ डिसेंबर १८ या कालावधीत ‘ईपीएफओ-भविष्य निर्वाह निधी’ सुरू असलेले आमरण उपोषण व आत्मदहन आंदोलन केंद्रीय श्रमराज्य मंत्री संतोषकुमार गंगवाल व भविष्य निर्वाह निधीचे अतिरिक्त आयुक्त राजेश्वर राजेश यांच्या आदेशानुसार मागे घेण्यात आले. त्यावेळी पेन्शनर्सना दरमहा ७५०० रूपये पेन्शन व त्यावर महागाई भत्ता देण्याचा प्रस्ताव ‘ईपीएफओ’ने तयार करून तो वित्त व पंतप्रधान कार्यालयास पाठविणे, पेन्शनर्सना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे यासह विविध मागण्या मंजूर झाल्या होत्या. मात्र ईपीएफओने वित्त मंत्रालय व पंतप्रधान कार्यालयास प्रस्ताव अद्यापही पाठविलेला नाही. पेन्शनर्सच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान पेन्शनर्सच्या मागण्यांना मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन माजी मंत्री रोहिदास पाटील,आमदार कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, प्रा. शरद पाटील यांनी दिले.
यावेळी वाय.जी. राजपूत, एल.आर. राव, पोपटराव चौधरी, महेश घुगे, रमेश निकम, सोमनाथ बागड, बी.एन. पाटील, टी.ए.राऊळ आदी उपस्थित होते.