धुळ्य़ात जुन्या इमारती ठरताय धोकादायक
By admin | Published: April 29, 2017 05:58 PM2017-04-29T17:58:49+5:302017-04-29T17:58:49+5:30
पावसाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याची मागणी केली जात आहे.
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 29 - शहरात 50 वर्षापेक्षा अधिक जुन्या इमारती उभ्या आहेत़ त्यांची मुदत संपूनही त्या उभ्या असल्याने ते कोसळतील याची शाश्वती नसल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याची मागणी केली जात आहे.
शहरातील जुने धुळेसह सहावी गल्ली, पाचवी गल्ली आणि बहुतेक ठिकाणी जुन्या इमारती आजही उभ्या आहेत़ त्यातील काही इमारतींना 100 वर्षापेक्षा अधिक काळ झाला आह़े पडक्या स्थितीत आलेल्या या इमारती तातडीने पाडून जमीनदोस्त करण्यासाठी महापालिकेने आत्तापासून हालचाल करण्याची आवश्यकता निर्माण झाली आह़े
शहरात नेमक्या कोणकोणत्या भागात जुनाट इमारती आहेत, त्याचा सव्र्हे महापालिका प्रशासनाने करायला हवा़ त्यातून किती इमारती पाडण्यायोग्य आहे, याची स्पष्ट माहिती उजेडात येईल़ सध्या तरी महापालिकेकडून अशा कोणत्याही प्रकारचा सव्र्हे झालेला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
दरवर्षी पावसाळ्याच्या अनुषंगाने जुन्या आणि धोकादायक ठरणा:या इमारतीच्या मालकांना नोटीस देवून ती पाडण्याबाबत सुचित केले जात़े दरवर्षी ही मोहीम अव्याहतपणे राबविण्यात येत असत़े त्याचा किती उपयोग होतो, हे आजतरी गुलदस्त्यातच आह़े नोटीस दिल्या जातात, पण ठोस कारवाई मात्र होताना दिसत नाही़