प्रलंबित मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 10:08 PM2019-01-07T22:08:12+5:302019-01-07T22:08:38+5:30
वीज कर्मचारी-अभियंते संघटना संयुक्त कृती समितीतर्फे धरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले़ या आंदोलनात अभियंते व कर्मचारी सहभागी झाले़
शासनाच्या अधिकारातील चारही वीज कंपन्यांमधील अधिकारी, अभियंते व कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात सातत्याने पाठपुरावा करीत आहेत़ पण न्याय मिळत नसल्याने लाक्षणिक संप पुकारण्यात आला़ महापारेषण कंपनीतील स्टाफ सेटअप लागू करीत असतांना आधीचे एकूण मंजूर पदे कमी न करता अमंलात आणावे, महावितरण कंपनीतील प्रस्तावित पुर्नरचना संघटनांनी सुचवलेल्या अंतर्भाव करूनच अंमलात आणावे, शासन व व्यवस्थापनाने महावितरण कंपनीने राबविण्यात येत असलेले खाजगीकरण करण्याचे धोरण थांबवावे, महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या लघु जल विद्युत निर्मित संचाने शासनाने अधिग्रहण न करता महानिर्मिती कंपनीच्या क्षेत्रात कार्यरत ठेवावे, महानिर्मिती कंपनीच्या २१० एमडब्ल्युचे संच बंद करण्याचे धोरण तात्काळ थांबवावे, सरकारच्या मंत्रीमंडळ समितीने तिन्ही कंपन्यातील सर्व कर्मचाºयांकरीता मान्य केलेली महाराष्ट्र शासनाच्या जुन्या पेन्शन योजनेच्या धरतीवरील पेन्शन योजना लागू करा या मागण्या आंदोलनाव्दारे करण्यात आल्या़ आंदोलनात वीज कर्मचारी-अभियंते संघटना संयुक्त कृती समितीचे कृष्णा भोयर, शंकर पहाडे, आऱटी़ देवकांत, सुनिल जगताप, सैय्यद जहिरोद्दीन, हिंदुराव पाटील व कर्मचारी सहभागी झाले़