मालपूरला पाऊस व जोरदार वादळी वाºयामुळे बाजरी पीक आडवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 09:56 PM2019-09-21T21:56:43+5:302019-09-21T21:57:03+5:30
हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार पाऊस व वाºयामुळे बाजरी पीक जमिनीवर आडवे झाले असून प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मालपूरसह संपूर्ण शिंदखेडा तालुक्यावर यावर्षी देखील दुष्काळाचे सावट कायम आहे. मात्र, कोरड्या दुष्काळाऐवजी यंदा ओल्या दुष्काळाची भिती शेतकºयांना सतावत आहे. डोंगर दºयातून पाणी पाझरत असल्यामुळे शेतकºयांची पिके पाण्याखाली येत आहे. त्यात विविध रोगांचा प्रादूर्भाव पिकावर दिसून येत आहे. दररोज पावसाची हजेरी लागत असल्यामुळे बाजरी, ज्वारी, मका हे संपूर्ण पिकच वाया जाण्याची भिती व्यक्त होत आहे.
मालपूरसह परिसरात शुक्रवारी रात्री जोरदार वाºयासह पावसाला सुरुवात झाली. जोरदार वाºयामुळे बाजरीचे दाण्याने भरलेले वजनदार कणीस भुईसपाट झाले आहे. यामुळे अगोदरच मेटाकुटीस आलेल्या शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पावसामुळे बाजरीचे पिक वाया जाणार असल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
अमरावती प्रकल्पातून १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा होत आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने मध्यरात्री धरणाचे चार दरवाजे १० मी.ने उघडून १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात केला असल्याचे सांगण्यात आले. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास अजून विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे, असा सुचना करण्यात आल्या आहेत.