धुळ्यानजिक वर्षापासून पुलाचे काम अपुर्णावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 09:53 PM2020-04-12T21:53:04+5:302020-04-12T21:53:25+5:30

गेल्या वर्षभरापासून सुरू आहे काम, अनेक ठिकाणी रस्त्याचे कामही थांबलेले

Due to the rainy years, the bridge work is in complete disrepair | धुळ्यानजिक वर्षापासून पुलाचे काम अपुर्णावस्थेत

धुळ्यानजिक वर्षापासून पुलाचे काम अपुर्णावस्थेत

googlenewsNext

धुळे : गेल्या दोन वर्षांपासून फागणे ते अमळनेर या रस्त्याचे नुतनीकरणाचे काम सुरू आहे. मार्च २०२० पर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मुदत होती.माञ मुदतीत हे काम पूर्ण झालेले नाही.अद्यापही फागणेजवळील पुलाचे काम रखडलेलेच आहे.
फागणे ते अमळनेर या २७ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली होती. त्याचबरोबर वाढत्या वाहनांच्या संख्येच्या मानाने रस्ता रूंदही होता. या रस्त्याचे रूंदीकरण, नुतनीकरण करण्यात यावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. केंद्रातील भाजप सरकारने आपल्या पहिल्या टप्याच्या कालावधीत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतली.
केंद्र शासनाच्या ‘एएनयुटीआय’ योजनेंतर्गत मेहेरगाव (ता. धुळे) ते अमळनेर या ‘एनएसके ५८’ या रस्त्याचे रूंदीकरण करण्यात येत आहे. यासाठी तब्बल १४९.७५ कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. यापैकी फागणे ते अमळनेर दरम्यानचे रस्त्याचे काम सुरू झालेले आहे.
२०१९ अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ते निर्धारित वेळेत झालेले नाही. रस्त्याचे बहुतांश काम झालेले आहे. त्यामुळे उर्वरित सर्व काम मार्च २०२० पर्यंत पूर्ण होईल, असे धुळ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले होते.
माञ अद्यापही फागणे गावाजवळील पूल (मोरी) तसेच वणी गावातील रस्त्याचे रुंदीकरण, डांगरी (ता.अमळनेर) येथील दोन मोरींचे, याशिवाय काहीठिकाणी रस्त्याचे किरकोळ काम अपूर्णच आहे.
सध्या लॉकडाउन सुरू असल्याने, या मार्गावर वाहतूकही सुरू नाही. त्यामुळे या कालावधीत रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी होऊ लागली आहे.
कामाला गती देण्याची आवश्यकता
रस्त्याचे अथवा पुलाचे काम करावयाचे झाल्यास त्यासाठी वळण रस्ता तयार करून पर्यायी मार्गाने वाहतूक करावी लागत असते. मात्र गेल्या २३ मार्चपासून राज्यात लॉकडाउन जाहीर झाल्याने या मार्गावर अत्यावश्यक सेवेची वाहने वगळता उर्वरित वाहने जात नाही. त्यामुळे रस्त्यावर एकदम शुकशुकाट आहे. या कालावधीत राहिलेल्या पुलांचे व रस्त्याचे कामही पूर्ण झाले असते. व हा रस्ता वाहतुकीसाठी उपयोगात आला असता. मात्र अद्याप ना रस्त्याचे काम सुरू झाले ना पुलाचे. आता ३० एप्रिलपर्यंत या रस्त्यावर वाहतुकीची शक्यता नसल्याने या कामाला गती देण्याची गरज आहे.

Web Title: Due to the rainy years, the bridge work is in complete disrepair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे