टंचाईच्या संकटातही धुळ्य़ात पाण्याची नासाडी सुरूच!

By Admin | Published: July 9, 2017 12:03 PM2017-07-09T12:03:05+5:302017-07-09T12:03:05+5:30

शहराच्या 40 टक्के भागाला पाणीपुरवठा करणा:या नकाणे तलावात अवघ्या सात ते आठ दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आह़े

Due to the scarcity of water, the waste of water in the erosion! | टंचाईच्या संकटातही धुळ्य़ात पाण्याची नासाडी सुरूच!

टंचाईच्या संकटातही धुळ्य़ात पाण्याची नासाडी सुरूच!

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत

 
धुळे, दि.9 -  शहरावर ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकलेले असतानाही दुसरीकडे मात्र पाण्याची नासाडी होत आह़े त्यामुळे पाण्याची नासाडी करणा:यांवर दंडात्मक कारवाई आवश्यक आह़े
यंदा फेब्रुवारीपासूनच सुरू झालेल्या उन्हाळ्याने तापमानाचा उच्चांक गाठल्यामुळे जलस्त्रोतांमधील पाण्याचे बाष्पीभवन मोठय़ा प्रमाणात झाल़े त्याचबरोबर लोकसंख्येचा भार मनपावर वाढत चालल्याने नियमित पाणी वापरातदेखील वाढ झाली आह़े  त्यामुळे शहराच्या 40 टक्के भागाला पाणीपुरवठा करणा:या नकाणे तलावात अवघ्या सात ते आठ दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आह़े 
तापी योजनेवरून पुरवठा
येत्या आठ दिवसांत पुरेसा पाऊस न झाल्यास नकाणे तलावातील जलसाठा संपुष्टात येईल, त्यामुळे संपूर्ण शहराला तापी योजनेवरून पाणीपुरवठा करावा लागणार आह़े मात्र, 42 किमीवरून पाणी आणून ते शहराला वितरित करण्यास लागणारा कालावधी वाढणार असल्याने बहुतांश भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार आह़े 
पाण्याची नासाडी सुरूच
शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झालेले असतानाही मोहाडी उपनगरात पाणीपुरवठय़ावेळी मोठय़ा प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याचे दिसून आल़े नळांना तोटय़ा नसल्याने शुद्ध पाणी वाहून तळे साचत आहेत,तर काही ठिकाणी नागरिक पाण्याची नासाडी करतात़ 
पाणीचोरीच जास्त
शहरात नासाडीबरोबरच पाणीचोरीदेखील मोठय़ा प्रमाणात होत़े सुमारे 70 ते 75 हजार मालमत्ताधारक असताना नळधारकांची संख्या निम्मेच आह़े त्यातही अनेकांकडे पाऊणइंची नळ कनेक्शन असताना प्रत्यक्ष नोंदीत अर्धा इंचीच दाखविण्यात आल्याचीही अनेक प्रकरणे शहरात असून त्या माध्यमातून पाणीचोरी होत़े त्यामुळे पाणीपुरवठय़ावर होणा:या खर्चापेक्षा निम्मेच उत्पन्न मनपाला दरवर्षी मिळते व 8 ते 10 कोटी रुपयांची तूट दरवर्षी सहन करावी लागत़े मात्र, तरीही पाणीपुरवठय़ातून किमान खर्चाइतके उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक वर्षात विशेष प्रयत्न झाल्याचे कधीही दिसून आलेले नाही़

Web Title: Due to the scarcity of water, the waste of water in the erosion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.