धुळ्यात अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 05:25 PM2018-04-17T17:25:09+5:302018-04-17T17:25:09+5:30

अक्षय्य तृतीयेनिमित्त उत्साह : लाखो रुपयांची उलाढाल; सोने खरेदीवर महिलांचा भर

Due to the shopping on the eve of Akshaya Trutiya in Dhule, crowds | धुळ्यात अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

धुळ्यात अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

Next
ठळक मुद्देअक्षय्य तृतीयेच्या सणानिमित्ताने आंबे खरेदीला अनेकांनी प्राधान्य दिले. पाच कंदील चौकात आंब्याचे दर सकाळी ८० ते १०० रुपये किलो या प्रमाणे होते. तर दुपारनंतर येथील विक्रेत्यांनी आंब्याच्या दरात १० रुपये कमी करून ७० रुपये किलो या प्रमाणे आंब्याची विक्री केली. दत्तमंदिर चौक, नेहरू चौक येथे आंबे विक्रेत्यांकडे आंब्याचे दर हे १०० ते १२० रुपये किलो याप्रमाणे होते.

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी झाली होती. सासूरवाशिणीला माहेरचा अक्षय्य आनंद देणारा अक्षय्य तृतीयेचा सण समजला जातो. या सणानिमित्ताने मंगळवारी बाजारात पेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. 
घागर खरेदीसाठी विक्रेत्यांकडे गर्दी 
अक्षय्य तृतीयेचा सण धुळे जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. या सणाच्या दिवशी घागर भरण्याची प्रथा आहे. त्यानुसार शहरातील साक्री रोड, जुना आग्रारोड, दत्त मंदिर परिसर, नेहरू नगर पाण्याची टाकीजवळ व अग्रवाल नगर परिसरातील विक्रेत्यांनी  घागर विक्रीसाठी ठेवल्या होत्या.  या दिवशी माठात पाणी टाकून त्यावर डांगर ठेऊन विधीवत पूजा केली जाते. या सणाच्या दिवशी विशेषत: खापरावर तयार केलेल्या पुरणपोळी व आंब्याचा रसाचा नैवेद्य दाखविला जातो.  त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी माठ, घागर व मातीपासून तयार केलेले खापर खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग दिसून आली. 
बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल 
या सणानिमित्ताने शहरातील   दुचाकी खरेदीसाठी मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या शो-रूमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. काहींनी अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येलाच गाड्या खरेदी केल्या. तर काही नागरिकांनी वाहनांच्या शोरूममध्ये जाऊन नोंदणी करून ठेवली असून  बुधवारी या गाड्या ताब्यात घेणार आहेत. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल झाली. दरम्यान, सुवर्ण बाजारतही सोने खरेदी करण्यासाठी सकाळी लगबग दिसून आली.

Web Title: Due to the shopping on the eve of Akshaya Trutiya in Dhule, crowds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे