सर्व्हरमधील तांत्रिक त्रुटींमुळे शेतकºयांची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 05:47 PM2017-09-12T17:47:08+5:302017-09-12T17:47:08+5:30
जिल्ह्यातील १९० लाभार्थ्यांना १९ लाखांची उचल . आधार कार्डच्या दुरूस्तीसाठी शेतकºयांची फिरफिर.
आॅनलाईन लोकमत
धुळे, दि.१२ : कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकºयांनी महाआॅनलाइनच्या संकेतस्थळावरून आॅनलाइन अर्ज सादर करावे, असे शासनाने सूचित केले होते. परंतु, मंगळवारी शहरातील महा-ई सेवा केंद्रामध्ये दुपारी १२ ते संध्याकाळपर्यंत संकेतस्थळाचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकºयांची पायपीट झाली.
दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील १९ लाभार्थ्यांना शपथपत्राची १९ लाखाची रक्कम वितरीत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्टÑीयकृत बॅँका उचल देण्यास अग्रेसर शासनाने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णयासोबत शेतकºयांना कर्जमाफीसोबत तातडीने दहा हजार रुपयांची उचल देण्याचे आदेश बॅँकांना दिले होते. त्यासाठी शेतकºयांना शपथपत्र सादर करणे गरजेचे होते. त्यासाठी जिल्ह्यातील तब्बल १९० शेतकºयांनी ३१ आॅगस्टपर्यंत शपथपत्र सादर केले. त्यात धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे २३ सभासद व राष्टÑीयकृत बॅँकेच्या १६७ शेतकºयांचा समावेश आहे. या शेतकºयांना दहा हजारांची उचल मिळाली आहे. ८७ हजार ४८५ शेतकºयांनी भरले अर्ज धुळे जिल्ह्यात आतापर्यंत ८७ हजार ४८५ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरले आहे. परंतु, अजुनही काही शेतकºयांना हे अर्ज भरताना अडचणी येत आहे. कर्जमाफीसाठी अर्ज भरताना शेतकºयांना नानाविध अडचणी येत आहेत; तर काही शेतकºयांना त्यांच्या आधारकार्डवरील पत्ता किंवा नावात बदल झाल्यामुळे त्यांचे अर्ज संकेतस्थळावरून स्वीकारले जात नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात ९९ टक्के आधार नोंदणी धुळे जिल्ह्यात २१ लाख ६९ हजार ५०४ इतकी लोकसंख्या आहे. त्यापैकी २१ लाख ६३ हजार ९६४ इतक्या जणांनी आधार नोंदणी केली आहे. आतापर्यंत ९९ टक्के आधार नोंदणी झाली असून आधार नोंदणीसाठी किट प्राप्त होताच, ही नोंदणी सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी महाआॅनलाइन केंद्रात दररोज हेलपाटे मारावे लागत आहे. मात्र, तांत्रिक कारण पुढे करून सर्व्हर बंद असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शासनाने पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. - समाधान पाटील, शेतकरी
आॅनलाइन अर्ज भरताना आधार कार्डवरील चुकांमुळे अर्ज भरलेच जात नाही. त्यामुळे रिकाम्या हाताने घरी परतावे लागते. - महादू पाटील, शेतकरी