Vidhan Sabha 2019 : दुरंगी लढतीमुळे चुरस वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 11:49 AM2019-10-12T11:49:18+5:302019-10-12T11:49:57+5:30

धुळे ग्रामीण : मनसे रिंंगणाबाहेर, ‘वंचीत’ प्रथमच भाग्य अजमावते

Due to the two-way fight, the churros grew | Vidhan Sabha 2019 : दुरंगी लढतीमुळे चुरस वाढली

dhule

Next

अतुल जोशी ।
धुळे : धुळे ग्रामीण मतदार संघात केवळ पाच उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी खरी लढत भाजप विरूद्ध कॉँग्रेस अशीच आहे. दुरंगी लढतीमुळे या मतदार संघात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. कॉँग्रेस आपला बालेकिल्ला शाबूत ठेवणार की प्रथमच या मतदार संघात कमळ फुलणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे.
धुळे ग्रामीण म्हणजे पूर्वीचा कुसुंबा मतदार संघ. एकेकाळी मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असलेल्या माजी मंत्री रोहीदास पाटील यांचा हा मतदार संघ. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रथमच या मतदार संघावर युतीचा झेंडा फडकला होता. तो एकमेव अपवाद वगळता अनेक वर्षांपासून या मतदारसंघावर कॉँग्रेसचेच वर्चस्व राहिलेले आहे. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघात भाजपला आघाडी मिळाली होती. अक्कलपाडा धरण या एका प्रमुख मुद्यावरच धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविली गेली आहे. आताही तोच मुद्दा प्रभावी आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून एकाही पक्षाला बंडखोरीला सामोरे जावे लागलेले नाही. निवडणूक रिंगणात अवघे पाचच उमेदवार आहेत. जिल्ह्यातील पाच मतदार संघांपैकी फक्त याच मतदारसंघात उमेदवारांची संख्या कमी आहे.
२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, भाजप व शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यामुळे मतविभाजन मोठ्या प्रमाणावर झाले होते. परंतु यावेळी युती-आघाडी झालेली आहे. त्यामुळे मतांचे विभाजन टळणार आहे. पूर्वी ही जागा शिवसेनेकडे होती. मात्र यावेळी ती भाजपसाठी सोडण्यात आली. या मतदार संघातून भाजपतर्फे अनेकजण इच्छूक होते. मात्र पक्षाने ज्ञानज्योती भदाणे यांना उमेदवारी दिली. गेल्यावेळी त्यांचे पती मनोहर भदाणे यांना भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र मोदी लाट असतांनाही या मतदार संघातून कॉँग्रेसचे कुणाल पाटील विजयी झाले होते.
गेल्यावेळी मनसेनेही या मतदारसंघातून आपला उमेदवार उभा केला होता. यावेळी मनसे निवडणूक रिंगणातून बाहेर तर वंचीत बहुजन आघाडी प्रथमच भाग्य अजमावत आहे. अर्थात पाच उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ही भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे विरूद्ध कॉँग्रेसचे कुणाल पाटील यांच्यातच आहे.
हा मतदारसंघ कॉँग्रेसचा बालेकिल्ला असून, हा गड शाबूत ठेवण्यासाठी कॉँग्रेसने पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. तर या मतदारसंघात भाजपचे कमळ फुलविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवडणूक प्रचाराची सुरुवातच या मतदार संघातून केलेली आहे. त्यावरून मतदार संघात किती चुरस आहे, याची स्पष्ट कल्पना येऊ शकते.
कुणाल पाटील दुसऱ्यांदा विधानसभेत जाणार की या मतदारसंघातून पहिल्यांदाच महिला उमेदवाराला विधानसभेत जाण्याची संधी मिळणार, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे. अर्थात मतदारांचा कौल महत्वाचा ठरणार असून, ते कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात, यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
भाजपच्या प्रचाराचे मुद्दे
महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार
शेती व शेती विकास साधण्यात येणार. बांबू शेतीमधून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार
आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचा विकास करण्यासाठी प्रयत्न
रोजगाराची निर्मिती करणार
सिंचनाचा प्रश्न मार्गी लावणार.मत्स शेती, फळ शेती, बांबू शेती यातून शेतकºयांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकºयांना प्रवृत्त करणार
काँग्रेसचे प्रचाराचे मुद्दे
मतदार संघाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार
काळखेडे परिसरातील तलावांचे खोलीकरण करणार, सिंचनाची कामे करण्यावर भर
सोनगीर गावाला दररोज पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार
सोनगीर गावाला बसस्थानकाची निर्मिती करणार
रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार

Web Title: Due to the two-way fight, the churros grew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे