धुळे विभागात झालेल्या  विविध आंदोलनांमुळे ‘एस.टी’ला ७ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 03:44 PM2018-06-23T15:44:15+5:302018-06-23T15:46:43+5:30

वर्षभरात २७ बसगाड्यांचे करण्यात आले नुकसान, प्रवाशांनाही बसली झळ

Due to various agitations in Dhule division, ST gets 7 lakhs rupees due to the strike | धुळे विभागात झालेल्या  विविध आंदोलनांमुळे ‘एस.टी’ला ७ लाखांचा फटका

धुळे विभागात झालेल्या  विविध आंदोलनांमुळे ‘एस.टी’ला ७ लाखांचा फटका

Next
ठळक मुद्देवर्षभरात झालेले विविध आंदोलनेजमावाने केलेल्या दगडफेकीत बसेसच्या काचा फुटल्यावर्षभरात सात लाखांचे नुकसान

अतुल जोशी। 
आॅनलाइन लोकमत
धुळे  : एस.टी. ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आहे. मात्र देशात अथवा राज्यात कुठलेही आंदोलन झाले, दंगल झाली की अनेकदा संतप्त नागरिकांकडून पहिला दगड एस.टी.वरच भिरकावला जातो. यात एस.टी.चे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. गेल्या वर्षभरात झालेले विविध आंदोलने, बंद यामुळे धुळे विभागात  २७ बसगाड्यांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यात महामंडळाला जवळपास सात लाखांचे नुकसान सोसावे लागले असल्याची माहिती धुळे विभाग नियंत्रक कार्यालयातून देण्यात आली. 
एस.टी. अर्थात ‘लालपरी’म्हणजे महाराष्टÑाच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून परिचीत आहे. एस.टी. अविरत सेवा देत असते. भाडेवाढ झाली, प्रवासाची अनेक साधने उपलब्ध असली तरी अनेकजण एस.टी.नेच प्रवास करण्यास प्राधान्य देत असतात. मात्र देशात असो वा राज्यात कुठेही  अप्रिय  घटना घडली तर अनेकदा बंद पुकारले जातात, आंदोलने केली जातात. या आंदोलना दरम्यान अनेकदा दगडफेकीच्या घटना होत असतात. अशावेळी काहीजण एस.टी.वरच पहिला दगडफेक करून आपला संताप व्यक्त करतात. दगडफेकीमुळे बसेसच्या काचा फोडल्या जातात. या शिवाय किरकोळ नुकसानही होत असते. यामुळे महामंडळाला मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे  लागते. 
जून १७ ते जून १८ या वर्षभराच्या काळात बसेसवर पाचवेळा दगडफेकीच्या घटना घडल्या. यात विभागातील २७ बसगाड्यांचे ६ लाख २२ हजार रूपयांचे नुकसान झालेले आहे. 
यात ५ जून १७ रोजी शेतकºयांनी संप पुकारला होता. मात्र यात एस.टी.चे नुकसान झाले नव्हते. ९ व १० आॅक्टोबर १७ रोजी खाजगी वाहतुकदारांचा संप होता. या संप दरम्यानही एस.टी.चे कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.
मात्र २०१८ या वर्षाची सुरवातच एस.टी.च्या नुकसानीनेच झाली. भीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद जिल्ह्यातही उमटले. जमावाने २ जानेवारी १८ रोजी जवळपास १३ गाड्यांवर दगडफेक करून काचा फोडल्या. त्यामुळे बसेसचे ३ लाख २९ हजाराचे नुकसान झाले. या घटनेचे पडसाद ३ जानेवारीही रोजीही उमटले. त्यादिवशी ७ बसेसचे नुकसान करण्यात आले. त्यामुळे महामंडळाचे १ लाख ४५ हजाराचे नुकसान झाले. तर ४ जानेवारी रोजी दोन बस गाड्यांवर झालेल्या दगडफेकीमुळे ३५ हजाराचे नुकसान झाले. 
एप्रिल महिन्यातही आरक्षणासाठी बंद पुकारण्यात आला होता. त्यात २ एप्रिल रोजी विभागातील ५ गाड्यांचे जमावाने नुकसान केले. त्यात महामंडळाला १ लाख १३ हजाराचे नुकसान सोसावे लागले. 


 

Web Title: Due to various agitations in Dhule division, ST gets 7 lakhs rupees due to the strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे