धुळ्यात पिचकारी, रंग खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 06:06 PM2018-02-26T18:06:59+5:302018-02-26T18:06:59+5:30

चैतन्य : होळी, धूलिवंदन सणानिमित्त शहरातील मंडळे सज्ज

Due to washing powder, color buys in the market | धुळ्यात पिचकारी, रंग खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग

धुळ्यात पिचकारी, रंग खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग

Next
ठळक मुद्देशहरातील फुलवाला चौक, महात्मा गांधी पुतळा व पाचकंदील चौकात विक्रेत्यांनी थाटलेल्या दुकानांवर १० ते ९०० रुपयापर्यंतच्या पिचका-या उपलब्ध आहेत.या पिचका-यांमध्ये नानाविध व्हरायटी विक्रेत्यांच्या स्टॉलवर उपलब्ध असलेल्या आहे.चित्तवेधक पिचकाºया लहान मुलांना विशेष आकर्षित करित आहेत. पिचका-यांसोबत तरुणाईला ‘डोलची’ चीही विशेष क्रेझ दिसत असून ५० ते १२० रुपयांपर्यंत ‘डोलची’ ची विक्री विक्रेत्यांकडून केली जात आहे. होळी व धूलिवंदन सणाच्या दिवशी लागणारे ‘हार-कंगण’ ही बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क 
धुळे :  होळी, धूलिवंदन सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यापार्श्वभूमीवर शहरातील बाजरपेठेत विक्रेत्यांनी पिचकारी व रंग विक्रीसाठी दुकाने थाटली आहेत. या विक्रेत्यांकडे आतापासूनच खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे. दरम्यान, हे सण उत्साहात साजरा करण्यासाठी शहरातील मंडळांचे कार्यकर्ते सज्ज झाले असून त्यानुसार कार्यकर्त्यांनी आपआपल्या चौकांमध्ये  जय्यत तयारी सुरू केली आहे. 
होळी व धूलिवंदन सण धुळे शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा यंदाही कायम ठेवत धुळे शहरातील गल्ली क्रमांक ६ मधील स्वतंत्र भांग्या मारूती मित्र मंडळ, वाडीभोकररोडवरील उत्तरमुखी मारूती मित्र मंडळ व अन्य मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. जुन्या धुळ्यातील काही भागात सोमवारी पताका व चौक सुशोभिकरणाचे काम सुरू होते. तर धूलिवंदन सणाच्या दिवशी डिजेच्या तालात पाण्याच्या शॉवरखाली  तरुणाईला नाचण्याचा मनमुराद आनंद लुटता यावा; यासाठी जुन्या धुळ्यात शॉवर लावण्याचे काम सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. 

Web Title: Due to washing powder, color buys in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.