विहिरी आटल्याने माळरान भकास, शेतकरी उदास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 10:56 PM2019-03-02T22:56:33+5:302019-03-02T22:58:27+5:30

माळमाथा परिसर। गुरांच्या चाºयासह पिण्याच्या पाण्याची भीषणता, उन्हाची वाढतेय तीव्रता 

Due to the wells of the well, the farmers are depressed | विहिरी आटल्याने माळरान भकास, शेतकरी उदास

विहिरी आटल्याने माळरान भकास, शेतकरी उदास

Next

संडे हटके बातमी
गणेश जैन । 
बळसाणे :  यंदाच्या पावसाने धोका दिल्याने साक्री तालुक्यासह माळमाथा भागात कमी स्वरूपात पेरणी झाल्याने माळरान उजाड दिसू लागले आहे़  प्रमुख चारा म्हणून वापरात येणारा कडबाही ज्वारीच्या पेरणीअभावी कमी पडणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत़
सध्याच्या परिस्थितीत बळसाणेसह माळमाथ्याचे जनावरांना जगविण्यासाठी शेतकºयांची चारा शोधमोहीम सुरु आहे़ तसेच काही शेतकरी आपल्या पाळीव प्राण्यांना विक्री करण्याचा निर्णय घेतांना दिसून येत आहे़ परिणामी अशा दयनीय अवस्थेत जनावरांना जगविण्याचा प्रश्न पशूपालकांसमोर उभा ठाकला आहे़
गेल्या वर्षी पाऊस बºयापैकी होता़ त्यामुळे चाºयासह पाण्याची टंचाई पाहिजे तशी जाणवली नाही़ यंदा मात्र पावसाने दांडीच मारल्याने याभागातील स्थिती याहीपेक्षा वाईट आहे़ पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगल्या प्रकारे पावसाने आपली एंट्री केली होती़ यामुळेच मोठ्या प्रमाणात खरीप पेरणी शेतकºयांनी केली होती़ त्यानंतर पावसाने धोका दिल्याने सर्वच पिके हातून गेली आजही बहुसंख्य शेतकºयांच्या विहिरीत पाणी नाही़ बाहेरून पाण्याचा टँकर विकत आणून पिके जगविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरु असताना त्यानंतर रब्बीची वाट पहात शेवटी शेतकºयांच्या पदरी निराशाच आली आहे़ पिकांची उगवण झालेली सर्व पिके व हरभºयाला कमी भार लागला असला तरी त्या आता उन्हामुळे माना टाकू लागल्या आहेत़ माळमाथा परिसरात कमी पाऊस झाल्याने नदी, नाले, तलाव, विहीरी, कुपनलिका कोरडे ठाक पडल्या आहेत़ त्यामुळे माळमाथा परिसरात सर्वत्र ओसाड आणि भकास व उजाड पडलेले माळरान दिसत आहे़ माळमाथा भागात गाय, म्हशी, बैल, शेळ्या मेंढ्या मोठ्या प्रमाणावर असून त्यांच्यासाठी चाºयाचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे़ या वर्षाचा पाऊस अत्यल्प झाल्याने फेब्रुवारी महिन्यापासून दुष्काळाची दाहकता वाढत चालली असून जनावरांचा चारा संपल्या ने पशूपालकांना जनावरांसाठी ऊस घेतल्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही़ शेतात उत्पन्न नाही, जनावरांना चारा नाही, पिण्यासाठी पाणी नाही, शेतकरी व मजूरांना हाताला कामे नसल्याने दुष्काळी परिस्थितीची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ जनावरांसह शेतकरी व मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे़  

बळसाणे परिसरात विदारक स्थिती
पाण्याचे स्तोत्र कोरडेठाक आहेत़ बळसाणे, दुसाने, निजामपूर, जैताणे, वाघापूर, नागपूर, वर्धाने, मसाले, इंदवे, हट्टी, ऐचाळे, घाणेगाव,  लोणखेडी, कढरे, छावडी, सतमाने, परसुळे, कर्ले आदी परिसरात जनावरांना लागणारे खाद्य अर्थात चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा बनला आहे़

ओसाड जमिनीची अशीही दैना
माळमाथा हा परिसर गेल्या काही वषार्पासून दुष्काळाशी सामना करत आहे़  त्याचप्रमाणे पाणी टंचाईने ही हैराण होत आहेत़ या परिसरात पाणी टँकर व चारा छावण्या सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे़ त्यामुळे पशुपालकांना पशुधन कसे सांभाळावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ शेतकºयांकडून चाराचा शोध घेतला जात आहे़  बळसाणेसह माळमाथा भागातील शेतकºयांना शेतीकाम करतांना उन्हाळ्याच्या झळा सोसाव्या लागत आहे़ शेतीसाठी शेतकºयांनी केलेला खर्च ही वसूल झालेला नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? मुलांचे शिक्षण, दवाखाना, घरातील सुख-दु:ख या संकटाचा सामना शेतकरी बांधवांना करावा लागत आहे़

Web Title: Due to the wells of the well, the farmers are depressed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे