धुळे महापालिकेत रंगांची उधळण, अधिकाºयांना डोलचीचा सपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 07:31 PM2018-03-01T19:31:03+5:302018-03-01T19:31:03+5:30

सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकाºयांचा सहभाग : महिलांकडूनही धुळवड साजरी

Dulchi's dream to the owners of Dhule Municipal Corporation | धुळे महापालिकेत रंगांची उधळण, अधिकाºयांना डोलचीचा सपका

धुळे महापालिकेत रंगांची उधळण, अधिकाºयांना डोलचीचा सपका

Next
ठळक मुद्दे-महापालिकेत होलिकोत्सव उत्साहात साजरा-सर्वपक्षीय नगरसेवक, राजकीय पदाधिकाºयांची धुळवड-अधिकाºयांना डोलचीने पाण्याचे सपके

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महानगरपालिकेत गुरूवारी होळी, धुलीवंदनाचा उत्साह दिसून आला़ सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रत्येक अधिकाºयाच्या दालनात जाऊन त्यांच्यावर रंगांची उधळण केली़ तसेच डोलचीने पाण्याचे सपकेही मारले़ 
धुळे महापालिकेत दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीच्या दिवशीच धुलीवंदन साजरे करण्यास सुरूवात झाली़ सकाळी ११ वाजल्यापासून माजी आमदार प्रा़ शरद पाटील, अतुल सोनवणे, रविंद्र काकड, प्रशांत श्रीखंडे, नगरसेवक अमोल मासुळे, सदाशिव पाटील, सुनिल सोनार, शिवसेनेचे राजेंद्र पाटील, भुपेंद्र लहामगे, चेतन मंडोरे, भरत खरात, विनोद जगताप, संदीप सुर्यवंशी, नंदलाल अजळकर, रविंद्र आघाव, धिरज चौधरी यांनी धुलीवंदन साजरे करण्यास सुरूवात केली़ प्रत्येक अधिकाºयाच्या दालनात जाऊन त्यांच्यावर रंग, पाणी उडविण्यात आले़ मुख्य लेखापरीक्षक राजू सोळूंके, उपायुक्त रविंद्र जाधव, सहायक आयुक्त शांताराम गोसावी, प्ऱ नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह कर्मचाºयांवरही रंगांची उधळण करण्यात आली़ ‘बुरा न मानो, होली है’ ़़  म्हणत महापालिकेच्या आवारात बादल्यांनी पाणी आणून एकमेकांना डोलचीने सपके मारण्यात आले़ तसेच स्पीकरवर होळीच्या गीतांवर सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी नृत्याचाही आनंद घेतला़ महापालिका आवारातून वाहनांवर जाणाºया नागरिकांवर देखील रंग उधळण्यात आले़  धुलीवंदनाच्या या उत्साहात मनपा कर्मचारी देखील सहभागी झाले होते़ त्यामुळे मनपात होळीचा चांगलाच उत्साह दिसून आला़ मनपात धुळवडीमुळे अधिकारी व कर्मचाºयांनी काढता पाय घेतल्यामुळे अनेक विभाग ओस पडले होते़ आयुक्तही उपस्थित नसल्याचे दिसून आले़ दुपारनंतर तर सुटी असल्याचे सारखेच वातावरण होते़ विरोधी पक्षनेत्या वैशाली लहामगे यांच्यासह शिवसेनेच्या महिला पदाधिकाºयांनी देखील धुळवड साजरी केली़ एकमेकांना रंग लावून होळी, धुलीवंदनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या़ 


 

Web Title: Dulchi's dream to the owners of Dhule Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.