धुळ्यात महिलेच्या घरातून गुंगीच्या औषधांच्या बाटल्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 01:44 PM2019-12-11T13:44:35+5:302019-12-11T13:45:01+5:30

चोरटी विक्री करण्याचा उद्देश, पोलिसांची कारवाई

Dung seized bottles of drugs in a woman's house | धुळ्यात महिलेच्या घरातून गुंगीच्या औषधांच्या बाटल्या जप्त

धुळ्यात महिलेच्या घरातून गुंगीच्या औषधांच्या बाटल्या जप्त

Next

आॅनलाइन लोकमत
धुळे : शहरातील गजानन कॉलनीमध्ये राहणाऱ्या महिलेच्या घरातून पोलिसांनी चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने साठवून ठेवलेल्या गुंगीकारक औषधाच्या १२ बाटल्या जप्त केल्या. यासंदर्भात महिलेविरोधात औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गजानन कॉलनीत राहणारी महिला घरात गुंगीकारक औषधांच्या बाटल्या चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार औैषध निरीक्षक मनोज नंदकुमार अय्या यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास गजानन कॉलनीतील निलोफर उर्फ मुन्नी सहिद शहा यांच्या घराची झडती घेतली. तेव्हा घरात १ हजार २२५ रुपये किंमतीच्या १२ लहान गुगीकारक औषधाच्या बाटल्या मिळून आल्या. सदर बाटल्याबाबत खरेदी पावत्या व डॉक्टरचे चिठ्ठीबाबत विचारले असता त्या महिलेला दाखविता आल्या नाही. म्हणून औषध निरीक्षक मनोज अय्या यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत कलम १८(सी), शिक्षा कलम २७(बी)(२), १८-ए शिक्षा कलम २८, २२(१)(सीसीए) शिक्षा कलम २२(३) व भादंवि कलम २७६ तसेच एनडीपीएस कायदा कल १९८५ चे कलम २२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्य कारवाई पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, हेड कॉन्स्टेबल अजीज शेख, कॉन्स्टेबल प्रेमराज पाटील, सुशिल शेडे, रविराज पवार, जयश्री मोरे, दिपाली माळी, होमगार्ड सविता मोरे या पथकाने केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सारिका कोडापे करीत आहे.

Web Title: Dung seized bottles of drugs in a woman's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे