पेट्रोलिंगवेळी दोन पोलीस अधिका:यांमध्ये हमरीतुमरी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2017 01:31 AM2017-05-09T01:31:49+5:302017-05-09T01:31:49+5:30
लळींग घाटातील प्रकार : बंदूक रोखल्याची चर्चा
धुळे : जनतेची भांडणे मिटविण्याची ज्यांच्यावर जबाबदारी असते अशा दोन पोलीस अधिका:यांमध्ये शुक्रवारी रात्री चांगलीच हमरीतुमरी झाली़ यादरम्यान एका पोलीस अधिका:याने चक्क दुस:यावर बंदूक रोखल्याची चर्चा सोमवारी पोलीस वतरुळात आह़े
गेल्या शुक्रवारी रात्री काही पोलीस निरीक्षकांना जिल्ह्यात दरोडा प्रतिबंधक (गस्त) पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले होत़े त्यानुसार त्यांची शहरानजीक मुंबई- आग्रा महामार्गावरील लळींग घाटात गस्त सुरू असताना काही कारणावरून दोन पोलीस निरीक्षकांमध्ये हमरीतुमरी झाल्याचे कळत़े हा वाद एक ते दोन तास सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आह़े दरम्यान या वादाची कुणकुण एका वरिष्ठ अधिका:याला लागली़ त्यांनी तत्काळ लळींग घाट गाठून दोघांची समजूत काढून वाद मिटविला़ हे प्रकरण दडपल्याचीही चर्चा आह़े दोघा पोलीस निरीक्षकांमध्ये त्यापूर्वी रात्रीच पोलीस अधीक्षक कार्यालयातही वाद झाल्याचे समजत़े
एलसीबीत बसण्याचे कारण?
दोघांच्या भांडणाचे कारण गुलदस्त्यात आह़े मात्र एलसीबीत बसण्यावरून वाद झाल्याचीही चर्चा आह़े
पोलीस निरीक्षकांमध्ये वाद झाल्याबाबत आपल्याला माहिती नाही़ याबाबत काही माहिती मिळाली तर पुढील निर्णय घेण्यात येईल.
- एम. रामकुमार
जिल्हा पोलीस अधीक्षक