धुळ्याच्या अभियंत्याचे डिजाईन ठरतेय कोरोनाच्या लढ्यात प्रभावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 09:14 PM2020-04-18T21:14:11+5:302020-04-18T21:14:42+5:30
किआॅक्स। डॉक्टरांचा करेल बचाव
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील सिद्धी इंडस्ट्रीज व क्रिएटिव्ह इंटिरियरने तयार केलेले कोवीड-१९ सॅम्पल कलेक्शन ‘किआॅक्स’ ही काचेची कॅबीन कोरोना विरुध्दच्या लढ्यात प्रभावी ठरत आहे़
रुग्णांचे नमुने घेणाऱ्या डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना यामुळे संरक्षण मिळणार आहे़ शासनाच्या वेगवेगळ्या विभागांकडून या तंत्रज्ञानाची मागणी होत आहे़ शासनाच्या विभागांना सदर तंत्रज्ञान दिले असल्याची माहिती सिध्दी इंडस्ट्रीजचे अभियंता संग्राम लिमये यांनी दिली़ त्यांनी नुकताच एक किआॅक्स बॉक्स हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील कोरोना कक्षाला भेट दिला़
संग्राम लिमये यांनी सांगितले की, धुळ्यातील सिद्धी इंडस्ट्रीजने विकसीत केलेले हे तंत्रज्ञान प्रसार माध्यमे व सोशल मीडियामुळे जगभरात पोहोचले़ यासंदर्भातली पोस्ट शासनाच्या विविध विभागांपर्यंत पोहोचल्या़ हे तंत्रज्ञान योग्य ठिकाणी पोहोचवण्याचे श्रेय सर्व फेसबुक आणि व्हाट्सअप वापरणाºया मित्रांचे तर आहेच शिवाय विविध प्रसार मध्यमांचे देखील आहे़ अशाच प्रकारे आपण पॉझिटिव्ह चांगल्या न्यूज शेअर करून या लढाईत कोरोनाला हरवू शकणार आहोत.
किआॅक्सच्या यशस्वी प्रयोगानंतर सिद्धी इंडस्ट्रीजने रुग्णांना व्हेंटिलेटरची ट्यूब घशात लावताना डॉक्टरांना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ‘इंट्युबेशन बॉक्स’ देखील तयार करण्याचे काम सुरू केले आहे़ इंट्युबेशन बॉक्स बद्दलची माहिती देखील अशाच प्रकारे जास्तीत जास्त शेअर करून कोरोनाविरूध्दच्या लढाईत सर्वांनी सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे़