धुळे येथे भरलेल्या विभागीय तंत्रनिकेतन प्रदर्शनात पेठची ई-सायकल प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:51 AM2019-03-20T10:51:26+5:302019-03-20T10:54:31+5:30

पाच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी २९ उपकरणे मांडली

E-bicycle for the first part of Regional Polytechnic exhibition at Dhule | धुळे येथे भरलेल्या विभागीय तंत्रनिकेतन प्रदर्शनात पेठची ई-सायकल प्रथम

धुळे येथे भरलेल्या विभागीय तंत्रनिकेतन प्रदर्शनात पेठची ई-सायकल प्रथम

googlenewsNext
ठळक मुद्देविभागीय तंत्रप्रदर्शनात २९ उपकरणे मांडलीविद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला दादअधिकाऱ्यांनी केली उपकरणांची पहाणी

आॅनलाइन लोकमत
धुळे : विद्यार्थ्यांनी तयार केलेली प्रदूषण विरहित ई-सायकल...रूग्णवाहिका, अ‍ॅम्बुलन्स आदी वाहनांसाठी तयार केलेली अ‍ॅटोमॅटीक ट्रॅफीक सिग्नल यंत्रणा.. विद्यार्थिनींनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या टिकाऊ वस्तू.. आदी उपकरणे मांडून विद्यार्थ्यांनी आपली कल्पना शक्तीचा प्रयत्य सर्वांना आणून दिला. विद्यार्थ्यांच्या या कल्पनाशक्तीला सर्वांनीच दाद दिली. दरम्यान नाशिक विभागीय तंत्रप्रदर्शनात पेठ (जि.नाशिक) येथील ई-सायकलला प्रथम क्रमांक मिळाला.
निमित्त होते नाशिक विभागस्तरीय तंत्रप्रदर्शन २०१९चे. येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कौशल्य विकास व उद्योजकता विकास महाराष्टÑ राज्य अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई संचलित व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिक व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षर कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे. या तंत्र प्रदर्शनात धुळ्यासह नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर येथील जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात उपकरणे मांडली होती.
या विभागीय तंत्रप्रदर्शनाचे उदघाटन महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक एस.आर. सूर्यवंशी होती. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व्ही.एम. राजपूत, अनुराग मोराणकर, वर्षा कुळकर्णी, आर.डी. अहिरे, प्राचार्य एम.के.पाटील होते.
विभागस्तरीय तंत्रप्रदर्शनाचा निकाल सायंकाळी जाहीर करण्यात आला. निकाल असा-प्रथम क्रमांक- ई-सायकल (शासकीय आयटीआय, पेठ- सहभागी रूपाली खंबायत, विठोबा खैरनार, रवींद्र राऊतमाळे. द्वितीय क्रमांक विभागून- प्रथम कार व्हॅक्युम क्लिनर ( शासकीय आयटीआय नगर, सहभागी प्रदीप मिसाळ, विशाल सांबार, तुकाराम व्यवहारे), द्वितीय-मीनी बॉटल कुलर (शासकीय आयटीआय,धुळे, सहभागी-चंद्रकांत चौधरी, अजय पडळकर)
तृतीय क्रमांक (विभागून)- चप्पल मेकिंग मशीन (शासकीय आयटीआय, जळगाव), इमरजन्सी ऐअर पंप (संगमनेर, सहभागी-अभिषेक शेळके, गणेश शेळके, शुभम देशमुख.
अधिकाऱ्यांकडून पाहणी
विद्यार्थ्यांनी मांडलेल्या उपकरणांची एस.आर. सूर्यवंशी, सुधाकर देशमुख यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनीही पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
परीक्षक म्हणून एस.एस. देसाई, आर.डी. अहिरे, गीता जोशी, अनुराग मोराणकर, अक्षय मित्तल यांनी काम पाहिले.

 

Web Title: E-bicycle for the first part of Regional Polytechnic exhibition at Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे