घोडेस्वार स्पर्धेत २२ पदकांची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 10:34 PM2019-02-28T22:34:50+5:302019-02-28T22:35:33+5:30
शिरपूर : राज्यस्तरीय स्पर्धेत मुकेशभाई सीबीएसई स्कूलचे वर्चस्व
शिरपूर : पुणे येथील जापालूप इक्वेस्टेरियन सेंटर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय घोडेस्वारी स्पर्धेत श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई संचलित तांडे ता. शिरपूर येथील मुकेशभाई आर.पटेल सी.बी.एस.ई. स्कूलच्या संघातील पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी बजावून २२ पदके पटकावत वर्चस्व राखले़
पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय घोडेस्वार स्पर्धेत येथील नील चौधरी, सुमित चौधरी, प्रेरक मोरे, तेजस बच्छाव, गितेश पाटील, राज गेहलोत, नीरज गेहलोत, यशराज लाछेता, जशराज चौधरी, कल्याणी पाटील, प्रसिद्धी जैन, नमी पाटील, तनिष्का नागवंशी, वैष्णवी कुलकर्णी, श्रेया परमार, प्रथमेश पंडीत, रुद्राक्ष यादव, साक्षी तोतला, सुयोग पाटील, दीपक चौधरी, सिद्धार्थ यादव या विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेखरीत्या कामगिरी बजावली. त्यामुळे त्यांनी २२ पदके पटकावित वर्चस्व राखले़ संघासोबत घोडेस्वारी कोच युसूफ अली उपस्थित होते. या घोडेस्वार संघाने स्लो जम्पिंग, बॉल एन्ड बकेट, पोल एन्ड बेंड आणि फ्लॅग रेस अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून गोल्ड सिल्वर व ब्रांज अशा पदकांची कमाई केली.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल एस.व्ही.के.एम. संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, विश्वस्त तपनभाई पटेल, चिंतनभाई पटेल, मुख्याध्यापिका पूनम ठाकूर यांनी कौतुक केले. यशस्वी विद्यार्थ्यांना घोडेस्वारी तज्ञ गौरंग त्रिपाठी, कोच युसूफ अली क्रीडा शिक्षक पूजा जैन, विपीन यांचे मार्गदर्शन लाभले.