मिठाई खा, पण आऊटडेटेडही पहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 05:40 PM2020-10-20T17:40:34+5:302020-10-20T17:41:19+5:30

व्यवसायिकांकडून कानाडोळा क नवरात्रोत्सव, दिवाळी दसऱ्यात खरेदी करतांना खात्री करा

Eat sweets, but also look outdated | मिठाई खा, पण आऊटडेटेडही पहा

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मिष्ठान्न व मिठाईबाबत नवीन नियमावलीकडे शासनाने जाहीर केली आहे. त्यानुसार विक्रीसाठी ठेवलेल्या खाद्य पदार्थाना १० ते १५ दिवस न ठेवता येत नाही. मात्र असा नियमा असतांनाही शहरात बिनधास्तपणे शासन निर्णयाचा भंग केला जात आहे. याबाबत लोकमत ने शनिवारी विविध दुकानांमध्ध्ये जावून रिॲलिटी चेक केली. त्यावेळी ग्राहकांना आऊडेटेड पदार्थ दिले जात असल्याचे दिसले.
नियमावलीनुसार कोणती मिठाई किती दिवस टिकेल याची माहिती ग्राहकांना होईल. यासाठी काऊंटरवरच पदार्थ किती दिवस टिकेल. याची माहीती गरजचे आहे. मात्र शहरातील बहूसंख्य दुकांनात विकले जाणारे पेढा, मिठाई, रवा, मोतीचुर लाडू, म्हैसूर पाक, बेसनापासून तयार केलेले मिठाई, दुधापासून बनविलेले केक बर्फी, साखरेपासून तयार केलेले पदार्थ, लिक्विड मिष्ठान्न असे खाद्य पदार्थ याबाबत कुठलीही माहिती दिली नसल्याचे दिसून आले. ग्राहकसुद्धा बिनधास्तपणे आऊटडेटेड पदार्थ खातांना दिसून आले.
नियमानुसार, तयार केल्यानंतर रबडी, बासुंदी असे दुग्धजन्य द्रव मिठाई, श्रीखंड, रसमलाई साधारण २४ तास, मावा मिठाई, पेढा दोन दिवस तर बेसनपीठापासून तयार होणारी मिठाई पाच दिवसांपेक्षा जास्त विक्रीसाठी ठेऊ शकत नाही. तसेच मिठाईची किंमत व तयार केल्याची तारीख याचे स्टीकर मिठाई सोबत ठेवणे आवश्यक आहे. ग्राहकांनी याकडे लक्ष देऊन आऊडेटेड मिठाई खरेदी करु नये, तसे आढळून आल्यास तक्रार करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागने केले आहे.

Web Title: Eat sweets, but also look outdated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे