कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 10:45 PM2020-08-20T22:45:36+5:302020-08-20T22:45:57+5:30
मनपा प्रभाग सात : नगरसेवकाने स्वखर्चाने केली सॅनिटायझरची फवारणी
धुळे : महापालिकेच्या प्रभाग ७ ड भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मशिनच्या सहायाने सॅनिटायझरची फवारणी करण्याचे काम सुरु आहे़ या भागाचे नगरसेवक स्वत: पुढे होऊन आरोग्य विभागाकडून काम करुन घेत आहेत़ नागरिकांनी समाधान व्यक्त केले़
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे़ त्यात मास्क लावणे, सॅनिटायझर अथवा साबणाने हात धुण्याचे आवाहन केले जात आहे़ त्याचाच एक भाग म्हणून महापालिका प्रभाग क्रमांक ७ ड मध्ये या प्रभागाचे नगरसेवक हर्षकुमार रेलन स्वत: पुढे होऊन फवारणीचे काम करवून घेत आहेत़
साक्री रोडवरील गणेश कॉलनी, पाडवी सोसायटी, शितल कॉलनी आणि या परिसरात सॅनिटायझरची फवारणी सुरु झालेली आहे़ फवारणीच्या कामांच्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते हिरामण गवळी, सिन्धी पंचायत अध्यक्ष गुलशन उदासी यांनी समक्ष भेट देऊन सम्पूर्ण उपक्रम समजून माहिती घेत पाहणी केली आणि या उपक्रमाचे समाधान व्यक्त केले़
दरम्यान, कोरोना रोखण्यासाठी आता नगरसेवकांनी पुढाकार घेतला असल्याचे रेलन यांच्या कामावरुन स्पष्ट होत आहे़