19 केंद्रावर आठ हजार विद्यार्थी देणार सीईटी परीक्षा
By admin | Published: May 10, 2017 05:01 PM2017-05-10T17:01:25+5:302017-05-10T17:17:25+5:30
जिल्ह्यातून 8 हजार 136 विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले असून शहरातील 19 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
Next
धुळे, दि.10- अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेणा:या विद्याथ्र्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे गुरुवारी तीन सत्रांत एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातून 8 हजार 136 विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले असून शहरातील 19 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
शहरातील कनोसा कॉन्व्हेंट, कमलाबाई कन्या हायस्कूल, जिजामाता कन्या हायस्कूल, एल.एम. सरदार हायस्कूल येथे प्रत्येकी 21 वर्गामध्ये 504 विद्यार्थी, न्यू सिटी हायस्कूलमधील 18 वर्गामध्ये 432 विद्यार्थी, जयहिंद हायस्कूलमधील अ आणि ब या दोन केंद्रातील प्रत्येकी 21 वर्गामध्ये 504 विद्यार्थी, महाराणा प्रताप विद्यालयात 11 वर्गामध्ये 264 विद्यार्थी, ङोड.बी. पाटील महाविद्यालयांत 15 वर्गामध्ये 360 विद्यार्थी, डॉ.पा.रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयात भाग अ व ब असे या दोन केंद्रांसह देवरे अभियांत्रिकी महाविद्यालय, देवरे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रत्येकी 16 वर्गामध्ये 384, महाजन हायस्कूलमधील 12 वर्गामध्ये 288, एकविरादेवी विद्यालयातील 11 वर्गामध्ये 264 विद्यार्थी, आर.आर. पाडवी नूतन विद्यालयातील 20 वर्गामध्ये 480 विद्यार्थी आणि शिवाजी ैहायस्कलमध्ये 288 विद्याथ्र्याची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
550 कर्मचारी नियुक्त
या परीक्षेसाठी सुमारे 550 कर्मचारी, अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना या संदर्भात दोन-तीन टप्प्यात प्रशिक्षणही देण्यात आले असून बुधवारी सकाळी ज्योती चित्रपटगृहात प्रशिक्षण पार पडले.
तीन पेपर होणार
गुरुवारी सकाळी 10 ते 11.30 यावेळेत पहिला, दुपारी 12.30 ते 2 या वेळेत दुसरा तर दुपारी 3 ते 4.30 यावेळेत तिसरा पेपर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी परीक्षा केंद्रांच्या 200 मीटर परिसरात प्रांत गणेश मिसाळ यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. परिसरात ङोरॉक्स, फॅक्स, ई-मेल, इंटरनेट सुविधा केंद्र बंद ठेवण्याचेही आदेशात नमूद केले आहे.