एकवीरादेवी यात्रोत्सवाची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 02:45 PM2019-04-17T14:45:05+5:302019-04-17T14:47:09+5:30

चैतन्य : उद्या जाऊळ उतरविण्याचा कार्यक्रम; १९ रोजी मंदिर परिसरात पालखी मिरवणूक

 The Ekaviradevi Yatosh Jayant preparations | एकवीरादेवी यात्रोत्सवाची जय्यत तयारी

dhule

Next

धुळे : खान्देश कुलस्वामिनी आदिशक्ती एकवीरादेवीच्या यात्रोत्सवास चैत्र पौर्णिमा अर्थात १९ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने मंदिर ट्रस्टच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. या यात्रोत्सवाच्या निमित्ताने लहान मुलांना आकर्षित करणारे पाळणे येण्यास सुरुवात झाली आहे. यात्रोत्सवात १८ रोजी जावळांचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी मंदीर परिसरात आदिशक्ती एकवीरादेवीची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
चैत्र नवरात्रोत्सवानिमित्ताने धार्मिक कार्यक्रम गेल्या आवड्यात गुढी पाडव्यापासून एकवीरा देवी मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला होता. तेव्हापासून श्रीराम नवमीपर्यंत एकवीरादेवी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकवीरादेवी मंदिरात दररोज भगवतीची पंचामृत महापूजा, सप्तशती पाठाचे वाचन, महानैवेद्य आरती आदी धार्मिक कार्यक्रमांचा समावेश होता.
उद्या उतरणार जाऊळ
एकवीरादेवी मंदिरात चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर म्हणजे १८ एप्रिल चावदसला जाऊळ उतरविण्याचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी खान्देशसह मध्यप्रदेश, राजस्थान राज्यातील भाविकही धुळ्यात येत असतात. या भाविकांची गैरसोय होऊ नये; म्हणून मंदिर संस्थानच्यावतीने भाविकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे; याउद्देशाने मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात तसेच मंदिराच्या पूर्र्वेकडच्या भागात भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे. दरम्यान चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़

Web Title:  The Ekaviradevi Yatosh Jayant preparations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे