वृद्धाचा रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: January 28, 2017 12:24 AM2017-01-28T00:24:15+5:302017-01-28T00:24:15+5:30
ध्वजारोहण समारंभ : जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील घटना
धुळे : शासकीय अधिका:यासह प्रवीण दंडावाणी यांच्याकडून अत्याचार होत असल्याचा आरोप करत रमेश शंकर चौधरी (वय 65, रा़ गोकर्ण हौसिंग सोसायटी, देवपूर) या ज्येष्ठ नागरिकाने प्रजासत्ताकदिनी शासकीय ध्वजारोहण समारंभावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला़ पोलिसांनी वेळीच रोखल्याने दुर्घटना टळली़ याप्रकरणी रमेश चौधरी यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
याप्रकरणी पो़ना. सचिन सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी रमेश चौधरी यांच्याविरुद्ध भादंवि कलम 309 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक भारत काळे करीत आहेत़
भूखंडातील गैरव्यवहारामुळे
टोकाचे पाऊल
4रमेश चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, मोराणे प्र.लळींग येथील शेत गट नं. 7/4 हा भूखंड गेल्या 30 वर्षापासून त्यांच्या ताब्यात होता़ या ठिकाणी ते स्पेअरपार्ट व हॉटेल व्यवसाय करीत होत़े मात्र 2013 मध्ये तत्कालीन अपर जिल्हाधिकारी अशोक करंजकर, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, मंडळाधिकारी सोमनाथ बागुल यांनी प्रवीण सुरेश दंडावाणी यांच्याशी संगनमत करून हा भूखंड हडप केला़ 14 ऑगस्ट 1989 रोजी विभागीय आयुक्तांनी त्यांच्या पूर्व परवानगीशिवाय कुठल्याही भूखंडाचे हस्तांतरण करू नये, असे आदेश दिलेले असतानाही हा भूखंड हस्तांतरित केला गेला़ त्यामुळे आपण तक्रार केली असता आपल्यावर हल्ले करण्यात आल़े याप्रकरणी न्यायालयातदेखील कामकाज सुरू आह़े तक्रार करतो म्हणून पोलिसांकडूनही त्रास सुरू असून चौकशी होत नसल्याने प्रजासत्ताकदिनीच आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला होता़ त्यानुसार त्यांनी सकाळी 8़15 वाजता अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला़