धुळ्यात गांधी राहूल राजीव नावाने येतंय वीज बील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 05:49 PM2020-09-03T17:49:33+5:302020-09-03T18:19:28+5:30
त्या नावाच्या व्यक्तीचे दोन वर्षांपूर्वीच झाले निधन, वीज कंपनीची माहिती
धुळे - ऐकावं ते नवलच .....नावातील साधर्म्य आश्र्चर्यकारक, गांधी राहुल राजीव ...या नावाने येणारे वीज बिल धुळे शहरातील माणिक नगर भागातील आहे. बिलावरील नाव वाचून धक्का बसला ना? मात्र हे नांव खरे आहे़ या नावाची व्यक्ती धुळ्यात हयात अर्थात जिवंत होती. साधारण दोन वर्षांपूर्वी हे नाव असलेल्या व्यक्तीचे निधन झाले आहे़ सध्या हे घर शाहजराम बसंत यादव या व्यक्तीने विकत घेतल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी किशोर खोब्रेगडे यांनी ‘लोकमत’शी बोलाताना दिली़
घर विकल्यानंतर ज्यांना घर विकलंय त्या व्यक्तीनं बिलावरील नांवात बदल केला नाही. यादव नामक या व्यक्तीच्या घरात प्रॉपर्टीचा वाद असल्याची माहिती मिळतेय. लाईट बिलावर नांव म्हणजे प्रॉपर्टी कार्ड नसल्याचं यापूर्वीच वीज वितरण कंपनीने देखील जाहीर केलंय. त्या प्रॉपर्टी मध्ये कोण राहतो? कोणाच्या नावावर याला महत्व नाही? त्या प्रॉपर्टीचा कर, लाईट बिल जोपर्यंत नियमित भरला जातो तो पर्यंत वारसाचा वाद येत नाही़ मात्र कर, लाईट बिल थकल्यानंतर जेव्हा कारवाईची वेळ येते तेव्हा मात्र वाद उफाळून येतात़ हा त्यातील एक प्रकार असल्याची चर्चा आहे़