अकराव्या जलसाहित्य संमेलनाला धुळ्यात सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 02:52 PM2018-01-20T14:52:00+5:302018-01-20T14:52:55+5:30

सांस्कृतिक : देशबंधू व मंजू गुप्ता फाउंडेशन व भारतीय जल संस्कृती मंडळातर्फे आयोजन

Eleventh Water Resources Sanitation begins in Dhule | अकराव्या जलसाहित्य संमेलनाला धुळ्यात सुरूवात

अकराव्या जलसाहित्य संमेलनाला धुळ्यात सुरूवात

googlenewsNext
ठळक मुद्देजलदिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी दिला पाणी वाचविण्याचा संदेश. दोन दिवसीय जल साहित्य संमेलनात ‘खान्देशचे जल’ या विषयावर होणार विचारमंथनरविवार, २१ रोजी दुपारी संमेलनाचा होणार समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क 
धुळे :  देशबंधू व मंजू गुप्ता फाउंडेशन, भारतीय जल संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अकराव्या जलसाहित्य संमेलनाला धुळे शहरातील देवपूर परिसरातील नकाणेरोडवरील वेदांत मंगल कार्यालयात शनिवारी सकाळी थाटात सुरुवात झाली. 
 संमेलनाच्या निमित्ताने शनिवारी शहरातील जयहिंद हायस्कूलपासून जलदिंडी काढण्यात आली. या जलदिंडीत जिल्ह्यातील नद्यांचे पाणी एका कलशात संकलित करून त्या कलशाची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी  विद्यार्थ्यांनी 'पाणी हेच जीवन',  'पाण्याचा वापर जपून करावा' असा संदेश दिला. यावेळी स्वागताध्यक्ष रावसाहेब बढे, जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव भामरे, संमेलन समितीचे सचिव डॉ. संजय पाटील, संजय झेंडे आदी उपस्थित होते. शहरातील जयहिंद हायस्कूलपासून जलदिंडीला सुरुवात झाली. पुढे ही दिंडी इंदिरा गार्डन, प्रमोद नगर येथील स्टेट बॅँक आॅफ इंडिया, तुळशीराम नगर, नकाणेरोडमार्गे संमेलनस्थळी आली. 
मान्यवरांच्या हस्ते उदघाटन 
जलदिंडीच्या मिरवणुकीची सांगता वेदांत मंगल कार्यालयात झाली. त्यानंतर मंगल कार्यालयात उभारण्यात आलेल्या देशबंधू गुप्ता नगरी येथे  मुकुंद धाराशिवकर विचारमंच येथे संमेलनाचे उदघाटन झाले. यावेळी अध्यक्षस्थानी आंतरराष्टÑीय ख्यातीचे जलतज्ज्ञ तथा संमेलनाचे अध्यक्ष  डॉ. माधवराव चितळे, महाराष्टÑ सिंचन सहयोग संस्थेचे अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे, भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव भामरे, दत्ता देशकर, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, जितेंद्र तलवारे, डॉ. संजय पाटील, जलतज्ज्ञ डॉ. धनंजय नेवाडकर आदी उपस्थित होते. 
प्रदर्शनाने वेधले लक्ष
संमेलनाच्या निमित्ताने मंगल कार्यालयाच्या प्रांगणात जलसाक्षरता प्रदर्शन भरविण्यात आले होते.  या प्रदर्शनातून उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. 

आमदार कुणाल पाटील यांना पुरस्कार 
जलसंधारणाची कामे करून जिल्ह्यातील शेतीचे क्षेत्र सिंचनाखाली आणणाºया धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते जलगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

पुस्तक प्रकाशन
संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मुकुंद धाराशिवकर लिखित द्रष्टे एम. व्ही. (सर विश्वेश्वरेय्या) या पुस्तकाचे प्रकाशन झाले. सूञसंचालन प्रा. सदाशिव सूर्यवंशी यांनी केले. आभार जल संस्कृती मंडळाचे गजानन देशपांडे यांनी मानले.

Web Title: Eleventh Water Resources Sanitation begins in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.