बोगस आदिवासी उमेदवारविरूध्द ‘एल्गार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 11:05 PM2019-09-18T23:05:13+5:302019-09-18T23:05:48+5:30

बोराडी : सर्वपक्षीय मेळाव्यात उपस्थित आदिवासी बांधवांनी केला संकल्प

Elgar against Bogus tribal candidate | बोगस आदिवासी उमेदवारविरूध्द ‘एल्गार’

dhule

Next

शिरपूर : तालुक्यातील बोराडी येथे आदिवासी संघर्ष समितीतर्फे बोगस हटावो, आदिवासी बचाओ मोहीमेअंतर्गत मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात बोगस आदिवासी उमेदवारांविरुध्द आदिवासी समाजाने एल्गार पुकारला. तसेच बोगस आदिवासी उमेदवाराला धडा शिकविण्याचा संकल्प आदिवासी समाजाने एकमताने केला़
बोराडी येथे मंगळवारी येत्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाचा सर्वपक्षीय मेळावा घेण्यात आला़ मेळाव्यात आदिवासी समाजाच्या समस्यांसह बोगस आदिवासींनी राजकीय आरक्षणात शिरकाव करुन आदिवासी समाजाच्या हक्कावर गदा आणत असल्याने व अतिक्रमण करु पाहणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध लढा उभारण्याचा निर्णय झाला. येत्या निवडणुकीत एकदा राजकीय पक्ष बोगस उमेदवाला पाठीशी घालून उमेदवारी दिली तर त्यांना धडा शिकविण्याची तयारी ठेवा, असा एल्गार समाजातील ज्येष्ठांनी व्यक्त केला.
माजी समाजकल्याण सभापती वसंत पावरा म्हणाले की, सर्वपक्षीय मेळाव्यात बोगस आदिवासी हटाव ही मोहिम राबविण्यात येत आहे़ तालुक्यात एकूण ४८ टक्के आदिवासी समाज आहे़ त्या समाजाचा विचारच केला जात नाही़ याउलट फक्त पैशांच्या जीवावर एका बोगस आदिवासीला तालुक्यात आणले गेले. त्याला उमेदवारी देवून मतदान करा हे सांगणे गैर आहे़ म्हणून येत्या विधानसभा निवडणुकीत पावरा समाजातील तरूणाईचा देखील विचार व्हायला हवा़ केवळ आमच्याकडे पैसा नसल्यामुळे डावलं जाते़
यावेळी भाजपा आदिवासी आघाडीचे रमेश वसावे यांनी सांगितले की, यंदा विधानसभा निवडणुकीत खºया समाजातीलच आदिवासी उमेदवाराला तिकिट मिळाले पाहिजे़ माजी समाजकल्याण सभापती वसंत पावरा, रमण पावरा, शिसाका संचालक जयवंत पाडवी, के़एस़ पावरा, सत्तारसिंग पावरा, ज्योती पावरा यांनी विचार मांडले.
यावेळी माजी जि.प. सदस्य रणजीत पावरा, प्रकाश पावरा, मालकातरचे सरपंच सत्तारसिंग पावरा, नारायण पवार, राष्ट्रवादी महीला आघाडीच्या ज्योती पावरा, माजी सभापती गिलदार पावरा, डॉ. हीरा पावरा, रमण पावरा, आनंद गायकवाड, गुलाबराव मालचे, विशाल पावरा, उदयभान पावरा, रावा पावरा यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. सुत्रसंचालन रमण पावरा, योगेश बादल यांनी केले तर आभार प्रदर्शन भरत पावरा यांनी मानले.

Web Title: Elgar against Bogus tribal candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे