पाणी अन् शिक्षणामुळे गरिबीचे निर्मूलन -अमरिशभाई पटेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 06:28 PM2017-07-19T18:28:45+5:302017-07-19T18:28:45+5:30
शिरपूर तालुक्यातील अजंदे बुद्रूक येथे 100 घरकुलांचे लोकार्पण
Next
आॅनलाईन लोकमत
होळनांथे, जि.धुळे,दि.१९ - गरीबी निर्मूलनासाठी जमिनीत पाणी आणि घरात शिक्षण गरजेचे आहे. मुलांना तुम्ही किती एकर जमीन कसायला सोडून जाणार आहात, त्यापेक्षा जमिनीत किती पाणी सोडून जाणार आहेत, हे महत्वाचे आहे. ग्रामीण भागातील जीवनमान उंचवायचे असेल तर जमिनीसाठी पाणी आणि घरात शिक्षण महत्वाचे आहे, असे प्रतिपादन आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले.
शिरपूर तालुक्यातील अजंदे बु. येथे घरकुल लोकार्पण सोहळा पार पडला. याप्रसंगी १०० घरकुलांचे लोकार्पण करण्यात आले. या वस्तीचे भूपेशभाई नगर असे नामकरण करण्यात आले आहे.
आमदार पटेल म्हणाले, गेल्या ३५ वर्षांपासून राजकारणात असून अनेक गावांमध्ये घरकुलांचे उद्घाटन केले. परंतू पहिल्यांदाच असे आदर्श घरकुल माझ्या पहाण्यात आले, असे सांगून त्यांनी गावासाठी १० लाख रुपयांचा आमदार निधी जाहीर केला. यावेळी त्यांच्याहस्ते दहावी परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.