धुळ्यात वृध्दांच्या सन्मानानंतर भावूक वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 10:43 PM2019-09-09T22:43:59+5:302019-09-09T22:44:24+5:30

जागतिक आजी आजोबा दिनाचे निमित्त : जैन सोशल गृपतर्फे ५० जोडप्यांचा हृदयसत्कार

Emotional atmosphere after honoring the elderly in the mist | धुळ्यात वृध्दांच्या सन्मानानंतर भावूक वातावरण

धुळ्यात वृध्दांच्या सन्मानानंतर भावूक वातावरण

Next

धुळे : जागतिक आजी-आजोबा दिनाचे औचित्यसाधून जैन सोशल गृपतर्फे शहरातील ५० आजी आजोंबाचा सन्मान करण्यात आला़ त्यांचे समाजातील स्थान किती महत्वाचे आहे, याबद्दलची जाणीव यावेळी करुन दिल्यामुळे भावूक वातावरण निर्माण झाले होते़ 
स्त्री शिक्षण संस्थेच्या कमलाबाई कन्या शाळेत हा सोहळा रविवारी पार पडला़ यावेळी नाशिक येथील राजमल   भंडारी, मंगलचंद साखला, शांतीलाल सांड, बाबु पोकरणा, डॉ़ कमलनयन सिंगवी उपस्थित होते़ वयोवृध्दांनी पारंपारीक राजस्थानी वेशभुषा परीधान केली होती़ वाजत गाजत त्यांचे स्वागत करण्यात आले़ धकाधकीच्या जीवनात तरुणांना आपल्या आजी, आजोंबाकडे बघायला त्यांची चौकशी करायला वेळ नाही़ ही बाब लक्षात घेऊन हा कार्यक्रम आणि त्यांचा सन्मान करण्यात आला़ 
याप्रसंगी हरीश चोरडीया, शशी भंडारी, राजेंद्र ताथेड, आशा छाजेड, प्रतिभा बंगानी, पारस दुगड, सुरेश चोरडीया, सचिन कापडीया, निलेश कांकरीया, गौतम मेहता, शैलेश ताथेड, सुरज खिलोसिया, प्रशांत सिंगवी, विजय दुगड, गिरीश कोचर, नितीन जैन, सुवर्णा चोरडीया, नीना बाफना, ललिता सांड, चेतन दुगड, तेजस श्यामसुखा, डॉली बेदमुथा, ओम जैन, नीरज चतूरमुथा, तेजस नाहटा, कुशल दुगड, देवेन नाहटा, गौरव बेदमुथा, प्रीतम दुगड, कल्पेश जैन, अभिषेक जैन, देवेन छाजेड, शीतल बोरा, दिपाली बोरा, प्रेरणा सिंगवी, मोहिनी भंडारी, श्वेता श्यामसुखा, अर्पिता कटारिया, नेतल बिनायक्या, मंगलाचरण, गिता सांड, वर्धमान सिंगवी, तनू सिंगवी, प्रतिमा बंगानी, निलेश रुणवाल यांचे सहकार्य लाभले़ 

Web Title: Emotional atmosphere after honoring the elderly in the mist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे