कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तत्काळ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:42 AM2019-03-10T11:42:26+5:302019-03-10T11:43:05+5:30
आंदोलनाचा इशारा: शिक्षक भारती संघटनेतर्फे प्रशासनाकडे मागणी
धुळे : राज्य व केंद्र शासनाच्या धोरणानुसार अनुदानित व अंशत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक पूर्ण वेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनासह सातव्या वेतन आयोगानुसार लाभ द्यावा अशा मागणीचे निवेदन शिक्षक भारती संघटनेतर्फे शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले़
सुधारित वेतन संरचने नुसारवर्ष २०१६ पासून प्रत्यक्ष लाभ देणे आहे. वेतन निश्चिती संबंधित शाळांच्या आस्थापनेवर करून ती ग्राह्य समजून वेतन बिले स्वीकारण्यात यावीत व ज्यावेळेस वेतननिश्चिती शिबीर घेण्यात येईल त्या वेळेस स्टेम्पिंग करावेत असे आदेश निर्गमित व्हावेत अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे़ अशपाक खाटीक, सी़टी़पाटील, सुधाकर माळी, दिलीप पाटील, राजेंद्र पाटील, पांडूरंग धनगर, अमृत पाटील, एऩएऩमहाले, डी़आऱपगारे, संजय पाटील, के़व्ही़सुर्यवंशी, अविनाश भदाणे, दिपक पाटील, आऱएस़ महाजन, अमीन कुरेशी, हर्षल पवार, के़ यु़ मासुळे, मिलींद पाटील, डी़एस़भोई, एऩएम़ जाधव, रणजित शिंदे आदींसह संघटनेचे पदाधिकाºयांच्या निवेदनावर सह्या आहेत़