साक्री रोडवरील अतिक्रमण हटणार!

By admin | Published: January 16, 2017 11:58 PM2017-01-16T23:58:11+5:302017-01-16T23:58:11+5:30

अतिक्रमणधारकांना दिलेली मुदत पूर्ण : 400 मीटर चौपदरीकरणाचे काम होणार, उर्वरित कामाचा पाठपुरावा

Encroachment on Sakri Road will be removed! | साक्री रोडवरील अतिक्रमण हटणार!

साक्री रोडवरील अतिक्रमण हटणार!

Next

धुळे : शहरातील साक्री रोडवरील अतिक्रमण काढण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नोटीस बजावण्यात आली असून लवकरच सदरचे अतिक्रमण काढण्यात येणार आहे, अशी माहिती या विभागाच्या सूत्रांनी दिली. शहरातील या साडेचार कि.मी. रस्त्याचे चौपदरीकरण प्रस्तावित असून त्यापैकी 400 मीटरचे काम यापूर्वीच मंजूर झाले आहे. अतिक्रमणधारकांची संख्या मोठी असल्याने वैयक्तिक नोटिसांऐवजी जाहीर नोटीस प्रसिद्धीस दिल्याचे सांगण्यात आले. 
15 दिवसांची मुदत पूर्ण
शहरातील गुरू-शिष्य स्मारकापासून साक्री रोडवरील हनुमान टेकडीजवळील ‘सर्कल’र्पयतचा रस्त्याचा भाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत मोडतो. शहरात हाच रस्ता चौपदरीकरणाचा बाकी असून लवकरच हे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी हे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. या संदर्भात 29  डिसेंबर रोजी जाहीर नोटिसीद्वारे या रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना आपापले अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यासाठी नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून पुढील 15 दिवस मुदत देण्यात आली होती. त्यामुळे किमान 15 जानेवारीर्पयत सदरचे अतिक्रमण स्वत:हून काढण्याची अपेक्षा होती.
आचारसंहितेचा अडसर नाही
राज्य विधानपरिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे सध्या आचारसंहिता लागू आहे. मात्र अतिक्रमण काढण्यास काही अडसर येणार नाही. महापालिकेने वेळ दिल्यास उद्याही अतिक्रमण काढण्यात येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
मनपा हद्दीत सर्वाधिक अतिक्रमण
या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागासह महापालिकेचीही हद्द आहे. चौपदरीकरणाचे काम करायचे तर या दोन्ही हद्दीत अतिक्रमण नको, अशी भूमिका या विभागाची आहे. विभागाच्या हद्दीत हाताच्या बोटावर मोजण्याइतपत अतिक्रमण आहे. परंतु विभागाची हद्द संपताच सुरू होणा:या महापालिकेच्या हद्दीत सर्वाधिक अतिक्रमण आहे. त्यामुळे संयुक्त मोहीम राबवूनच दोन्ही हद्दीतील अतिक्रमण हटविले जाणार आहे. महापालिकेचा कर्मचारी वर्ग केव्हा उपलब्ध होतो, त्यावर ही अतिक्रमण निमरूलन करण्याची कारवाई अवलंबून आहे.
400 मीटरचे काम लवकरच
साक्री रोडवरील मोती नाल्यापासून मोहन मेडिकल दुकानार्पयत 400 मीटरचे चोैपदरीकरणाचे काम मंजूर आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण हटविताच ते काम सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
खुणांवरून समजणार अतिक्रमण
या रस्त्यावरील अतिक्रमण पाच वर्षापूर्वी काढण्यात आले होते. त्यावेळी सव्र्हे करण्यात येऊन खुणा गाडण्यात आल्या होत्या. त्या अद्याप कायम असून त्याद्वारेच अतिक्रमण ठरणारे बांधकाम व अन्य साहित्य या अतिक्रमण निमरूलन मोहिमेंतर्गत हटविण्यात येणार आहे.
चौपदरीकरणानंतर सदर रस्ता 18 मीटर म्हणजे सुमारे 54 फूट रुंद होणार असून मध्यभागी दुभाजक राहणारा आहे. दोन्ही बाजूच्या गटारांर्पयत हा रस्ता राहणार असून त्यानंतर ‘पेव्हर ब्लॉक’ही बसविण्यात येणार आहे. त्यामुळे सदर रस्त्यावर अतिक्रमण करणे शक्य होणार नाही. तसेच त्यामुळे रस्ताही खराब होणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Encroachment on Sakri Road will be removed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.