ग्रामीण भागात उत्साह, तुलनेत शहरी भागात कमी मतदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:24 PM2019-04-29T23:24:17+5:302019-04-29T23:24:45+5:30

धुळे लोकसभा मतदार संघ :  मतदारांचे पायघड्या टाकून आणि गुलाबपुष्प देऊन  स्वागत

The enthusiasm in rural areas, lower polling compared to urban areas | ग्रामीण भागात उत्साह, तुलनेत शहरी भागात कमी मतदान 

ग्रामीण भागात उत्साह, तुलनेत शहरी भागात कमी मतदान 

Next

लोकमत आॅनलाईन 
धुळे : धुळे लोकसभा मतदार संघातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी मतदारांच्या स्वागतासाठी पायघड्या टाकण्यात आल्या होत्या. पुष्पगुच्छ देऊन स्वागतही करण्यात आले. ग्रामीण भागात सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. शहरात सकाळी उत्साह चांगला होता. मात्र उन्हाचा चटका जाणवू लागताच मतदान केंद्रांवर शांतता पसरलेली दिसली. 
धुळे  लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रियेच्या पाहणीसाठी आयोजित दौºयात विविध ठिकाणी मतदारांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असल्याचे दिसून आले. 
पर्यटन मंत्रीचे दोंडाईचात मतदान
दोंडाईचा येथे नगरपालिका शाळा क्रमाक २ मधील मतदान केंद्रात सकाळी ७ वाजता राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल त्यांच्या पत्नी सुभद्राकुमारी रावल, सरकारसाहेब रावल आणि नगराध्यक्षा नयनकुवर रावल यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला.  
आदिवासी बांधवांमध्ये उत्साह
शिरपूर तालुक्यात आदिवासी पाडयामध्ये सकाळपासूनच मतदानासाठी उत्साह दिसून आला. तालुक्यातील बोराडी, उमरदा,   दुरबडया याठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
मजूर मतदानासाठी आले
विशेषत: गोहाडापाडा येथील २५-३० मजुर  नाशिक येथे वीट कामासाठी गेले होते़   रविवारी रात्री १० वाजेपर्यंत  काम करून पहाटे ते घरी आले़  नंतर ४ किमी अंतर पायपीट करून ते मतदानासाठी आल्याचे पिंट्या पठाण पावरा यांनी सांगितले़ 
१ मॉकपोलमुळे उशीराने सुरु झाले मतदान - मतदान सुरु करण्यापूर्वी सकाळी सहा ते सात वाजेपर्यंत मॉक पोल करण्यात येऊन ५० मते टाकण्यात आले. ते मते उडवून सात वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरु करायची होती. मात्र शहरात तीन मतदान केंद्रावर मॉकपोल ती मते उडविण्यास उशिर झाल्याने १५ मिनीटे उशिरा मतदान  सुरू झाले़ 
२ मॉक पोल डिलीट केले नसले तरी मतमोजणीवेळी ते वजा करण्यात येतील. व्हीव्हीपॅटचा वापरामुळे ही मते वजा करणे शक्य होईल अन्यथा पुर्नमतदान घ्यावे, लागले असते.
३ मालकातर येथील मतदान केंद्रावर सुद्धा मॅकपोल मशिनमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने कंट्रोल युनीट बंद पडले. त्यामुळे  २० मिनीटे उशिराने मतदान  सुरु झाले़ 
विज नसल्याने मोबाईलच्या उजेडात काम
शिरपू तालुक्यातील उर्मदा येथे सकाळी ११ वाजता मतदानासाठी  पुरूष व महिला मतदारांच्या  लांबपर्यंत रांगा केल्या होत्या़ याठिकाणी रविवारपासून वीजपुरवठा खंडीत आहे.  वीज नसल्यामुळे मतदान अधिकारी मोबाईलच्या प्रकाशाने मतदारांची यादी शोधत होते़ मतदान केंद्रावर सकाळी ६़३० वाजेपासून महिला मतदारांनी रांगा लावलेल्या होत्या़ याठिकाणी काळापाणी २ किमी तर कढईपाणी ७ किमी अंतरावरून मतदान मतदानासाठी येत होते़याठिकाणी महिला मतदारांमध्ये अधिक उत्साह दिसून आला.
कापडणे येथे कंपार्टमेंट बोर्डवरील ठळक नोंदींचा अभाव
कापडणे येथील मतदान केंद्रात बॅलेट युनिटच्या ठिकाणी मतदान करताना गोपनीयता कायम असावी यासाठी निवडणूक आयोगाने पाठविलेल्या   कंपार्टमेंट  पाठविली आहेत. या कपार्टंमेटवर  निवडणूक आयोगाचे चिन्ह, मतदारसंघाचे नाव व क्रमांक, मतदानाची तारीख, मतदान केंद्राचे नाव व क्रमांक याची माहिती लिहीलेली असते. परंतू  कापडणे येथील एच एस बोरसे हायस्कूल  येथील मतदान केंद्र क्रमांक 68 व 69 या केंद्रातील आकर्षक कंपार्टमेंट वरील महत्त्वाच्या बाबी ठळक अक्षरात दुपारी एक वाजेपर्यंत लिहिलेल्या दिसून आल्या नाहीत.
सेल्फीसाठी गर्दी
दोंडाईचा येथील नगरपालिका शाळा क्रमांक २ मध्ये मतदानासाठी येणाºया मतदारांना सेल्फी काढण्यासाठी सेल्फी पॉर्इंट होता. या सेल्फी पॉर्इंटवर सकाळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल व सरकारसाहेब रावल यांनीही सपत्नीक फोटो काढले. त्यानंतर मतदानासाठी येणाºया प्रत्येक मतदाराने याठिकाणी फोटो काढण्याचा आनंद घेतला.
निरगुडी आदर्श मतदान केंद्र
शिंदखेडा तालुक्यातील निरगुडी येथील आदर्श मतदान केंद्रावर येणाºया मतदारांचे स्वागत हे गुलपुष्प देऊन करण्यात येत होते. याठिकाणी सुद्धा दुपारीही मतदारांची रांग लागली होती.

Web Title: The enthusiasm in rural areas, lower polling compared to urban areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.