पर्यावरणाचा होणारा -हास थांबविणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 10:11 PM2019-02-15T22:11:44+5:302019-02-15T22:12:34+5:30
विद्यापीठस्तरीय कार्यशाळा : झेड.बी.पाटील महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेत ८० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
धुळे : गेल्या काही वर्षात पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ºहास झालेला आहे. यामुळे तापमानातही वाढ झालेली असून, पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजेत असा सूर कार्यशाळेत उमटला.
जयहिंद शैक्षणिक संस्थेच्या झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयात ‘जागतिक तापमान वाढीचा वातावरणावर होणारा परिणाम-जाणिव जागृती’ यावर विद्यार्थ्यांसाठी आयोजित एकदिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात वरील सूर उमटला.
कार्यशाळेचे उदघाटन महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन प्रा. सुधीर पाटील यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी.एच. पवार होते.
यावेळी बोलतांना प्रा. सुधीर पाटील म्हणाले की, पर्यावरण रक्षणासंदर्भात जागृती करण्याचे उत्कृष्ट माध्यम म्हणजे विद्यार्थी आहे. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज झालेली आहे. पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत जाणारा ºहास व त्याचे सजीव सृष्टी व मानवी जीवनावर होणारे परिणाम आज अनुभवास मिळत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
प्राचार्य डॉ. पवार म्हणाले, पर्यावरणाचा ºहास थांबविण्यासाठी आपण स्वत:च पाऊल उचलले पाहिजे.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थी विकास विभागाचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. हशिम शेख म्हणाले, महाराष्टÑातील सर्वाधिक मृत्युदराची कारणे वायु प्रदुषण, पर्यावरणीय परिस्थिती यात दिसून येते. प्रदुषणामुळे मृत्यूदर वाढला आहे. तर डॉ. प्रकाश पाटील म्हणाले, १०० वर्षात पृथ्वीचे तापमान ०.८ डिग्रीने वाढले आहे.
प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. विलास जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रियंका निकुंभ यांनी केले. याकार्यशाळेत विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील जवळपास ८० विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यशाळा यशस्वीतेसाठी समिती सदस्य प्रा. विजय पवार, प्रा.डॉ. प्रविणसिंग गिरासे, प्रा.डॉ. योगिता पाटील, प्रा.डॉ. अमोल पाटील, प्रा. प्रसाद निकुमे, प्रा. गितांजली बागल, प्रा. रूपाली चव्हाण, प्रा.डॉ. दीपक नगराळे, प्रा. पूनम देवरे, प्रा. मनोज बच्छाव, प्रा. प्रतिभा पाटील, प्रा. किशोर पाटील आदींनी परिश्रम घेतले.