सरपंच स्मिता भामरे यांना पर्यावरण संवर्धन पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 05:25 PM2019-02-22T17:25:02+5:302019-02-22T17:29:58+5:30
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेंतर्गत कार्य
शिंदखेडा तालुक्यातील सार्वे गावाची लोकसंख्या १ हजार ५५ एवढी तर कुटुंबांची संख्या १९८ आहे. २०११-१२ मध्ये तंटामुक्त गाव, त्याच वर्षात कुपोषणमुक्त गाव, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २०१६-१७ मध्ये हगणदारी मुक्त गाव हे पुरस्कार मिळाले आहेत. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेंतर्गत २०११ ते २०१४ पर्यंत तिन्ही वर्षांचे निकष पूर्ण करून १ मे २०१५ मध्ये गावाला पर्यावरण विकासरत्न पुरस्कार मिळाला. निसर्ग मित्र अभियानांतर्गत माजी सरपंच शरद पंडित भामरे यांना २०१३-१४ मध्ये निसर्ग मित्र पुरस्कार मिळाला. २०१८ मध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत जलसंधारण, मृदसंधारण कामांचे निकष पूर्ण करून तालुक्यात गावाने प्रथम क्रमांक मिळविला आहे. श्रमदानातून नर्सरी रोपवाटीका तयार करण्यात आली असून त्याद्वारे गावात व परिसरात वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धनही केले जात आहे. सर्वत्र =एलईडी पथदिवे, समाज मंदीर सुशोभिकरण, महिलांसाठी सार्वजनिक शौचालय आदी कामे करण्यात आली आहेत. कार्यक्रमात सरंपच स्मिता भामरे यांचा पुरस्कार उपसरंपच आशााबाई भामरे यांनी स्विकारला होता़