धुळे येथे अपघातात जखमी होवूनही विद्यार्थ्यांनी दिला पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 04:32 PM2018-03-08T16:32:06+5:302018-03-08T16:32:06+5:30

विद्यार्थ्यांना उडविल्यानंतर कार घराच्या प्रवेशद्वारावर धडकली

Even after being injured in an accident in Dhule, the students gave the paper | धुळे येथे अपघातात जखमी होवूनही विद्यार्थ्यांनी दिला पेपर

धुळे येथे अपघातात जखमी होवूनही विद्यार्थ्यांनी दिला पेपर

Next
ठळक मुद्देपेपर देण्यासाठी विद्यार्थी केंद्राबाहेर उभे होतेभरधाव वेगाने येणाºया कारने विद्यार्थ्यांना धडक दिलीअपघातानंतर चालक कार सोडून फरार

आॅनलाईन लोकमत
धुळे : दहावीच्या पेपरसाठी केंद्राबाहेर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना  कारने जोरदार धडक दिली. यात चार विद्यार्थी जखमी झाले. जखमींवर तत्काळ खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर जखमी अवस्थेतच त्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला. विद्यार्थ्यांच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.  ही घटना  गुरूवारी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास नूतन पाडवी हायस्कूलजवळ घडली.
दहावीचा आज इंग्रजीचा पेपर होता. या पेपरसाठी सकाळी सव्वा दहावाजेपासून विद्यार्थी मील रोडवरील नूतन पाडवी हायस्कुल या केंद्राजवळ जमा होत होते.
अशातच साडेदहा वाजेच्या सुमारास मील परिसराकडून वेगाने कार आली.कारने केंद्राबाहेर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना धडक दिली. त्यानंतर ती कार शाळेजवळील एका घराच्या प्रवेशद्वाराला धडकली.
या अपघातात जो.रा. सीटी हायस्कुलमधील दहावीचे विद्यार्थी  भूषण पाटील, किरण क्षिरसागर, राधेकृष्ण पाटील (सडगाव), निरंजन पाटील (सडगाव) हे  जखमी झाले. यात भूषण पाटीलच्या पायावरून गाडीचे चाक गेले. तर किरणच्या कपाळ, चेहरा सोलला गेला. उर्वरित दोघ विद्यार्थ्यांनाही मार लागला. त्यांना तत्काळ एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. वर्ष वाया जावू नये म्हणून त्यांनी जखमी अवस्थेतच पेपर दिला.
अर्धातास मिळाला जादा
यातील दोघ विद्यार्थ्यांना दवाखान्यात उपचारासाठी अर्धातासापेक्षा जास्त वेळ लागला. त्यामुळे त्यांना पेपर सोडविण्यासाठी अतिरिक्त अर्धातास देण्यात आल्याची माहिती दिली.
घटनास्थळी अधिकाºयांची भेट
अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकाºयांसह माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे,  जो.रा.सिटी हायस्कुलचे अध्यक्ष रवी बेलपाठक, सचिव संतोष अग्रवाल व शिक्षकांनी रूग्णालयात जावून विद्यार्थ्यांची आस्थेवाईक चौकशी केली.
अनर्थ टळला
घटना घडली तेव्हा अनेक विद्यार्थी शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर उभे होते. कारचा वेग अधिक असता, तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी चर्चा सुरू होती.
घराच्या प्रवेशद्वाराचे नुकसान
विद्यार्थ्यांना धडक दिल्यानंतर कार शाळेलगत असलेल्या एका घराच्या प्रवेशद्वाराला धडकली. त्यात प्रवेशद्वाराचे नुकसान झाले. तसेच कारचेही नुकसान झाले.
कार चालक फरार
अपघात झाल्यानंतर चालक गाडीसोडून फरार झाला. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


 

Web Title: Even after being injured in an accident in Dhule, the students gave the paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.