धान्याचा लाभ सर्वांनाच मिळाला पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 10:13 PM2020-04-13T22:13:37+5:302020-04-13T22:13:51+5:30
आमदार कुणाल पाटील : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी बैठकीत निर्णय
धुळे : तालुक्यातील रेशनकार्ड धारकांना १२ एप्रिलपासून मोफत तांदूळ देण्यात येत आहे. या योजनेच्या लाभापासून कुणीही वंचित राहू नये याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी सूचना आमदार कुणाल पाटील यांनी केली.
आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत मनपात झालेल्या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, तहसीलदार किशोर कदम, तालुका पुरवठा निरीक्षक सी. एस. चौधरी आदी उपस्थित होते. या वेळी आमदार पाटील यांनी पुरवठा विभागाच्या कामाचा आढावा घेतला. तालुक्यातील काही गावातील नागरिकांकडे बारकोड नसलेल्या व आॅनलाइन नोंदणी न झालेले रेशनकार्ड आहे, त्यांनाही धान्याचे वितरण झाले पाहिजे. शासनाच्या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये. शासनाने मे आणि जून महिन्यात रेशनकार्ड धारकांना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू ८ रुपये किलोने आणि २ किलो तांदूळ १२ रुपये किलोने वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशी सूचना आमदार पाटील यांनी केली.तसेच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत तांदूळ वाटप १२ एप्रिलपासून होत आहे. तालुक्यासाठी आवश्यक तांदळाचा साठा उपलब्ध झाला असल्याचेही मिसाळ यांनी सांगितले.