धुळ्यात रंगला माजी विद्यार्थ्यांनी मेळावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 03:13 PM2018-02-14T15:13:53+5:302018-02-14T15:15:18+5:30

स्रेह मेळावा :  ३० वर्षानंतर एकत्र आलेल्याल मुलांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा 

Ex Students gather in Dhule | धुळ्यात रंगला माजी विद्यार्थ्यांनी मेळावा 

धुळ्यात रंगला माजी विद्यार्थ्यांनी मेळावा 

Next
ठळक मुद्देया स्रेह मिलनाच्या निमित्ताने समाजाप्रती असलेले आपले उत्तरदायित्व म्हणून सामाजिक कार्यातून सहयोग व सहभाग घेण्याचा निर्णय येथे उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी सुनीता सोंजे, माया सांगळे, निता सराफ, स्वाती शाह, रेखा दहिवदकर, जयश्री पवार, हेमलता देशमुख, निर्मला गिरासे, कवीता चंद्रात्रे, नर्मता कोटेचा, उमा बंग, तसेच संजय नागमोती, मिलिंद त्रिवणकर, विलास बावीस्कर, वसंत पाटील, साहेबराव जाधव, गणेश पिंगळे, इंदिराया सोहळ्याचे आयोजन नितीन केले, अ‍ॅड. मिलिंद बोरसे, प्रशांत वारूडकर, खिमजी पटेल, गोपाल सोलंकी, श्याम गवळी, मनोज वाघ, जयवंत जाधव, भैय्या पाटील, अ‍ॅड. सचिन झेंडे, प्रवीण कोठार२ी, अ‍ॅड. शिरीष वैद्य, अ‍ॅड. संदीप सराफ, अ‍ॅड. विजय वाघ, नरेंद्र वसईकर यांनी केले ह

लोकमत न्यूज नेटवर्क 
धुळे :  उत्सुकता, आश्चर्य व आनंद या संमिश्र भावनांमध्ये जयहिंद महाविद्यालयातील १९८८ च्या बी. कॉ. शाखेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्रेह मिलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जिवनातील प्रसंग ऐकमेकांना सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. 
शहरातील मालेगावरोडवरील एका हॉटेलमध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जयहिंद महाविद्यालयातील १९८८ च्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी ३० वर्षानंतर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संपर्कात आले होते. या माध्यमातून जुन्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क करीत स्रेह  मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी पुणे, अहमदाबाद, नाशिक, मुंबई, खेतीया, जळगाव याठिकाणाहून ४५ मित्र-मैत्रिणी एकत्र आले होते. 
आपल्या  महाविद्यालयीन जीवनातील विविध आठवणी, एकमेकांमधील निर्माण झालेले प्रसंग, प्राध्यापकांविषयी आत्मियता  या बाबी या निमित्ताने उपस्थितांना कथन केल्या.

Web Title: Ex Students gather in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.