रद्दीच्या बदल्यात नव्या कोया वहया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:36 PM2019-06-13T12:36:02+5:302019-06-13T12:37:39+5:30

समाजोपयोगी उपक्रमाचा शुभारंभ : वह्यांवर ३५ ते ५० टक्के डिस्काउंट

In exchange for the junk, new koaya | रद्दीच्या बदल्यात नव्या कोया वहया

दिपप्रज्वलन करतांना राजेश भतवाल, योगेश भंडारी,  संजय  भतवाल,   किशोर भांगडीया, सिद्धार्थ गिंदोडीया, ललित ललवाणी

googlenewsNext

धुळे : आनंद नोटबुक्सच्या पर्यावरणपूरक उपक्रमाच्या संकल्पनेत युवाशक्ती फाउंडेशन व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने  वह्यांवर ३५ ते ५० टक्के डिस्काउंट व रद्दीच्या बदल्यात नव्या कोºया वह्या या कार्यक्रमाचा शुभारंभ नितीराज इंजिनियर्सचे संचालक राजेश  भतवाल (उद्योगपती) यांच्या हस्ते बुधवारी सकाळी साडे दहा वाजता प्रकाश चित्रमंदिर जवळील रचना हॉल येथे झाला.
कार्यक्रमास  शिरपूर पिपल्स को-आॅप बँकेचे संचालक  योगेश भंडारी, रोटरी क्लबचे अध्यक्ष   संजय भतवाल, निर्मल आॅईल मीलचे संचालक   किशोर  भांगडीया, एम. डी. किंग्ज प्रा. लि. चे संचालक सिद्धार्थ गिंदोडीया आदींसह मान्यवर उपस्थित होते. सुरूवातीला मान्यवरांचे नाविन्यपूर्ण पध्दतीने पुष्पगुच्छाचा वापर न करता नोटबुक देवून स्वागत करण्यात आले.  प्रास्ताविक विवेक काळे तर. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रमोद  बºहाडे यांनी केले. या वह्या १२ ते १६ जून या मर्यादीत कालावधीत रचना हॉलला उपलब्ध राहणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

Web Title: In exchange for the junk, new koaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे