बाजारात शेतकयांकडून खरेदीचा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:33 AM2019-08-29T11:33:40+5:302019-08-29T11:33:58+5:30
पोळा : सर्जाराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा होतो सण
धुळे / कुसुंबा: भारतीय संस्कृतीनुसार पोळा सण दोन दिवसावर येवून ठेपला आहे़ त्यानिमित्त शहरी व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे़ शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे पोळ्याच्या दिवशी शोभायात्रा काढली जाणार आहे़
कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी व पशुपालक मोठ्या प्रमाणात गर्दी दिसुन आली़ यावेळी शेतकºयांची बैलांसाठी निरनिराळे प्रकारचे गोंडे, मातीचे बैल, घुंगरांच्या माळा, रंगाचे डबे, विविध रंग, गळ्यातील चामडी पट्टे, बैलांच्या पाठीवर टाकण्यासाठी रंगीत झूल, हिरव्या रंगाचे गोंडे, पितळी घंटा, पायातील पैजन, गळयातील हार, प्लास्टिक कवड्यांच्या माळा खरेदीसाठी प्राधान्य दिले जात आहे़ बाजारात रासायनिक, नैसर्गिक रंग उपलब्ध झाले आहेत़ यंदा दहा ते बारा टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. बाजारात बैल सजविण्यासाठी लागणारे घुंगरमाळा, शेंबी, बाशिंग, रंग, मोरखी, कासरा, घोगर, घाटी हिंगूळ, पट्टा, गोंडे विक्रेत्यांकडे उपलब्ध होते.
बैलांच्या शिंगांना रासायनिक रंग वापरा ऐवजी, नैसर्गिक रंग वापरावे. तसेच अंगावर रासायनिक रंगाचे ठसे वापरामुळे खाज सुटणे, अँलर्जी होणे, लाल चट्टे व केस गळून शकतात़
- डॉ़ रमन गावीत
-पशुवैद्यकीय दवाखाना, कुसुंबा