अर्थसाहाय्य योजनेसाठी बीपीएलची अट वगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 11:08 AM2018-02-15T11:08:17+5:302018-02-15T11:09:18+5:30

धुळे शहर जिल्हा कॉँग्रेस कमिटीतर्फे प्रशासनाला निवेदन

Exclude the condition of BPL for the financial assistance scheme | अर्थसाहाय्य योजनेसाठी बीपीएलची अट वगळा

अर्थसाहाय्य योजनेसाठी बीपीएलची अट वगळा

Next
ठळक मुद्देठराविक कुटुंबाचे नावे बीपीएल यादीत समाविष्टगरिब, निराधार या योजनेपासून वंचीतप्रमाणपत्र सादर करतांना वृद्धांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : राष्टÑीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेसाठी बीपीएलची अट वगळावी, अशी मागणी धुळे शहर जिल्हा कॉँग्रेस कमिटीतर्फे जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. 
निवेदनात म्हटले आहे, की मनपातर्फे झालेल्या सर्वेक्षणात काही ठरावीक कुटुंबाचे नाव बीपीएल यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. अजूनही अनेक पात्र कुटुंबातील सदस्यांचे नाव  बी.पी.एल. यादीत समाविष्ट झालेले नाहीत. परिणामी,  जे गरीब व निराधार आहे. तेच लोक या योजनेपासून वंचित राहत आहेत.  तसेच तहसीलदारही संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभ घेणाºया लाभार्थींकडून हयातीचे प्रमाणपत्र मागवत आहेत. या प्रमाणपत्रासाठी आधारकार्ड मागितले जाते. त्यासाठी लाभार्थी दोन तास रांगेत उभे राहून कागदपत्रे सादर करीत आहेत. ही योजना वयोवृद्ध, अपंग, विधवा या घटकांसाठी आहे. परंतु, हयातीचे प्रमाणपत्र सादर करताना वृद्धांचे प्रचंड हाल होत असून याकडे लक्ष देणे प्रशासनाने गरजेचे आहे. 
अन्यथा आंदोलन करणार...
राष्टÑीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेसाठी असलेली बीपीएलची अट रद्द करणे, हयातीचे दाखले मागिवणे बंद करण्यासंदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा धुळे शहर जिल्हा कॉँग्रेस कमिटीचे गोपाल अन्सारी, मुजफ्फर हुसेन, शेख जावेद, गोपाल चौधरी, मुखतार अन्सारी, वसीम सरदार, शरीफ शेख, वसीम बारी आदींनी दिला आहे. 


 

Web Title: Exclude the condition of BPL for the financial assistance scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.